S M L
Football World Cup 2018

बोनी कपूरची चारही मुलं राहणार एकत्र, बहिणींसाठी अर्जुननं घेतला निर्णय

श्रीदेवी यांच्या अकस्मित निधनामुळे सावत्र भावंडं अर्जुन कपूर-अंशुला कपूर आणि जान्हवी कपूर-खुशी कपूर खूपच जवळ आले आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Mar 12, 2018 02:58 PM IST

बोनी कपूरची चारही मुलं राहणार एकत्र, बहिणींसाठी अर्जुननं घेतला निर्णय

12 मार्च : घरातली एखादी व्यक्ती जेव्हा जग सोडून जाते तेव्हा घरात पोकळी निर्माण होते. जो अनुभव सर्वसामान्यांचा, तोच अनुभव सेलिब्रिटींचाही. श्रीदेवीच्या निधनानं जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर अगदी एकटे पडले. पण दुसरी एक गोष्ट घडली. ती म्हणजे, श्रीदेवी यांच्या अकस्मित निधनामुळे सावत्र भावंडं अर्जुन कपूर-अंशुला कपूर आणि जान्हवी कपूर-खुशी कपूर खूपच जवळ आले आहेत. या कठीण प्रसंगी अर्जुनचा पाठिंबा मोलाचा ठरलाय.

मागचे सगळे हेवेदेवे मागे टाकत इतक्या खंबीरपणे परिवाराच्या पाठीशी उभ्या असलेल्या अर्जुनचं खूपच कौतुक केलं जातंय. त्यापुढे जाऊन अर्जुनने अजून एक मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. अर्जुनने आपल्या सावत्र बहिणींसाठी बहीण अंशुलाला घेऊन बोनी यांच्या घरी एकत्र राहण्याचं ठरवलंय. यानंतर बोनी यांची चारही मुलं आता एकाच घरात राहणार असल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close