Home /News /entertainment /

सैफ नव्हे तर 'या' व्यक्तीला घाबरली करिना कपूर, बिर्याणी-हलव्याला केलं Bye-Bye

सैफ नव्हे तर 'या' व्यक्तीला घाबरली करिना कपूर, बिर्याणी-हलव्याला केलं Bye-Bye

अलीकडेच बेबोने दोन व्हिडिओ शेअर केले होते. एक व्हिडिओ स्वादिष्ट बिर्याणीचा आणि दुसरा मुगाच्या हलव्याचा होता. परंतु हे दोन्ही व्हिडीओ (Viral Video) शेअर करून करिना चांगलीच अडचणीत सापडली आहे.

  मुंबई, 26 मार्च-   करिना कपूर खान  (Kareena Kapoor-Khan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपल्या फॅमिली फोटोंसह, स्वादिष्ट पदार्थांचेही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच बेबोने दोन व्हिडिओ शेअर केले होते. एक व्हिडिओ स्वादिष्ट बिर्यानीचा आणि दुसरा मुगाच्या हलव्याचा होता. परंतु हे दोन्ही व्हिडीओ  (Viral Video)  शेअर करून करिना चांगलीच अडचणीत सापडली आहे. पाहूया नेमकं काय घडलं? सर्वसामान्य माणूस असो किंवा कलाकार त्यांची कोणतीच गोष्ट सोशल मीडियावर लपून राहात नाही. कितीही अट्टाहास केला, तरी एखादा फोटो व्हायरल झाला की त्यावर काहीच इलाज नसतो. करिना कपूर खानदेखील सोशल मीडियावर स्वादिष्ट पदार्थ खातानाचा व्हिडिओ शेअर करुन चांगलीच अडकली आहे. ती यामध्ये अशी काही अडकली आहे की, आता तिने बिर्यानी आणि हलव्याला रामराम केलं आहे. सोशल मीडियावर पदार्थांचे व्हिडीओ टाकून बेबो कशी अडकू शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुम्हाला करिनाचा लेटेस्ट व्हिडीओ पाहून याचं उत्तर मिळेलच.
  खरं, सांगायचं तर ही एक मजेशीर पोस्ट आहे. करिना इतर कुणाला नव्हे तर तिच्या योगा इन्स्ट्रक्टरला घाबरत होती. अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती घराच्या टेरेसवर योगा करत आहे. व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, - 'जेव्हा तुमचा योग प्रशिक्षक तुम्हाला इन्स्टा वर फॉलो करतो, तेव्हा बिर्याणी आणि हलव्याला बाय म्हणण्याची वेळ येते. या कॅप्शनसह करीना कपूर खानने #UntilWeMeetAgain या हॅशटॅगचा वापर केला आहे.
  करिनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मुलगा जेहच्या जन्मापासून ती चित्रपटांपासून दूर आहे. यावर्षी ती बहुप्रतीक्षित 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान दिसणार आहे. यासोबतच बेबो ओटीटीवरही पदार्पण करणार आहे. ती सुजॉय घोषसोबत एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor

  पुढील बातम्या