Home /News /entertainment /

ब्रह्मा मिश्राच नव्हे तर 'या' कलाकारांचासुद्धा कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह

ब्रह्मा मिश्राच नव्हे तर 'या' कलाकारांचासुद्धा कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह

प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या काही कलाकारांचे विचित्र स्थितीत झालेले मृत्यू चाहत्यांच्या मनाला मोठा चटका लावून गेले आहेत.

     मुंबई,3 डिसेंबर-   काही क्षणांपूर्वी आपल्या समोर खळखळून हसणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू  (Sudden Death)  झाल्यानंतर बसणारा मानसिक धक्का  (Mental shock)  मोठा असतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांचे अकाली आणि अनपेक्षितरीत्या मृत्यू (Untimely death) झाले आहेत. कोणाच्याही मृत्यूचा चटका बसतोच; मात्र प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या काही कलाकारांचे विचित्र स्थितीत झालेले मृत्यू चाहत्यांच्या मनाला मोठा चटका लावून गेले आहेत. मिर्झापूर   (Mirzapur)  वेबसीरिजमध्ये 'ललित'ची भूमिका साकारणाऱ्या ब्रह्मा मिश्रा (Brahma Mishra) या तरुण कलाकाराचा मृत्यू झाल्याचं काल (2 डिसेंबर 2021) उघडकीला आलं. मुंबईतल्या घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत ब्रह्माचा मृतदेह आढळला. ब्रह्माच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला असून, मृत्यूबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. संदिग्ध अवस्थेमध्ये मृत्यू झाल्यानंतर अतिशय वाईट स्थितीमध्ये मृतदेह सापडणारा ब्रह्मा हा काही पहिलाच अभिनेता नाही. यापूर्वीदेखील काही सेलेब्रिटींचा अचानक मृत्यू होऊन कुजलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह (Rotten corpse) आढळले आहेत. 'दैनिक भास्कर'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ओम पुरी 6 जानेवारी 2017 रोजी ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी (Om Puri) यांचा संशयास्पद स्थितीमध्ये मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावण्यात आला होता; मात्र डोक्याला दुखापत झाल्यानं ओम पुरी यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टच्या (Postmortem) आधारे पोलिसांनी नंतर स्पष्ट केलं होतं. मृत्यू झाला त्या वेळी ओम पुरी घरात एकटेच होते. त्यामुळं भिंतींवर डोकं आदळल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या ड्रायव्हरनं शेजाऱ्यांच्या मदतीनं घराचा दरवाजा उघडला होता. समांतर आणि मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांमधल्या ओम पुरींच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. त्यांनी हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम्, हॉलिवूड आणि ब्रिटिश अशा एकूण 300 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. परवीन बाबी 1976 साली टाइम मासिकाच्या (time magazine) मुखपृष्ठावर झळकलेली परवीन बाबी (Parveen Babi) ही पहिली बॉलिवूड स्टार ठरली होती. परवीनचा मृत्यू हे आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे. 22 जानेवारी 2005 रोजी घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन दिवसांपासून परवीनचा मृतदेह घरात पडला होता. 1970 आणि 1980 च्या दशकातली मोठी स्टार असलेली परवीन मृत्यूच्या काही दिवस अगोदर एकांतवासात गेली होती. तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. त्यामुळं तिने आत्महत्या केली, की तिचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. तिला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया (Paranoid schizophrenia) असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. कृतिका चौधरी बालाजी प्रॉडक्शनच्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री कृतिका चौधरी हिचा (Kritika Chaudhary) जून 2017 मध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. मुंबईतल्या अंधेरीमधल्या चार बंगला परिसरातल्या एका इमारतीमध्ये कृतिकाचा मृतदेह सापडला होता. मृतदेह सापडल्याच्या चार दिवस आधी कृतिकाचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ती घरात एकटीच राहायची. एका सोमवारी सायंकाळी फ्लॅटमधून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. अवघ्या 6 हजार रुपयांसाठी तिची हत्या (Murder) करण्यात आल्याचं पोलीस तपासात नंतर उघड झालं. 24 वर्षीय कृतिकानं कंगना रनौटसह 'रज्जो' या चित्रपटात आणि 'सावधान इंडिया' या क्राइम सीरियलमध्येही काम केलं होतं. समीर शर्मा 'ये रिश्ते हैं प्यार के,' 'कहानी घर घर की' या मालिकांमध्ये काम केलेला टीव्ही अभिनेता समीर शर्मानं (Samir Sharma) ऑगस्ट 2020मध्ये मुंबईतल्या त्याच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या (Suicide) केली होती. मृतदेह सापडण्याच्या दोन दिवस आधी समीरचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. सोसायटीच्या गार्डने त्याला पंख्याला लटकलेलं पाहिलं होतं. त्यानंतर पोलिसांना व सोसायटीतल्या इतर नागरिकांना ही माहिती मिळाली.या कलाकारांशिवाय असे अनेक लहान-मोठे कलाकार आहेत, ज्यांच्या मृत्यूचं गूढ आजपर्यंत उलगडलेलं नाही. अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्यांचे मृतदेह सापडले होते.
    First published:

    Tags: Entertainment

    पुढील बातम्या