फक्त बोलत नाही करुन दाखवतो; शेतात राबणाऱ्या मुलींसाठी काही तासात सोनू सुदने पाठवला ट्रॅक्टर

फक्त बोलत नाही करुन दाखवतो; शेतात राबणाऱ्या मुलींसाठी काही तासात सोनू सुदने पाठवला ट्रॅक्टर

सोनू सूदने ट्विट करुन या मुलींच्या शिक्षणासाठी बैल पाठवणार असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत त्याने थेट ट्रॅक्टरचा शेतकऱ्याकडे पाठवून दिला

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : कोरोना व्हायरसच्यादरम्यान बॉलिवूडपासून दाक्षिणात्य सिनेमात आपल्या नकारात्मक भूमिकेसाठी ओळखला जाणारा सोनू सूद रिअर लाइफ हिरो म्हणून ओळखला जात आहे. कोरोना व्हायरसदरम्यान लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्याने हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं. मजुरांना मदत केल्यानंतर सोनू सूद आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

शेतात राबणाऱ्या आंध्रप्रदेशातील त्या दोन मुलींचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोनू हळहळला होता. त्या मुलींच्या शिक्षणाची काळजी त्याने व्यक्त केली होती. त्यानंतर सोनू सूदने तातडीने त्या कुटुंबासाठी ट्रॅक्टर पाठविला आहे. सुरुवातील त्याने या कुटुंबाला बैलांची जोडी पाठविणार असल्याचे सांगितले होते. शेतातल्या अनेक भागात अजुनही पेरण्या सुरू आहेत. आंध्र प्रदेशातल्या चित्तुर जिल्ह्यात एका शेतकरी आपल्या मुलींना घेऊन पेरणी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या शेतकऱ्याजवळ बैल नसल्याने त्याने पेरणी करतांना आपल्या मुलींनाच पेरणी यंत्र ओढायला लावलं होतं.

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने त्याला मुलींनाच पेरणीसाठी जुंपलं असल्याचं दिसून येत होतं. त्या दृश्यांमुळे सोनू सूद हेलावून गेला. त्याने लगेच ट्विट करत उद्या सकाळी या शेतकऱ्यांच्या शेतात बैल जोडी असेल असं सांगितलं. शेतकरी हा देशाचा महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्याने त्या मुलींना शिक्षणासाठी पाठवावं, मी शेतात बैल पाठवून देतो असं त्याने ट्विटरवरून जाहीर केलं होतं. सोनू सूदच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान सोनू आता सोशल मीडियावर गेल्या एक दोन दिवसात व्हायरल झालेल्या 'वॉरिअर आजीं'ची मदत करणार आहे. त्याने या आजीबाईंची सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे मदतीची घोषणा देखील केली आहे. या ट्वीटमध्ये सोनू असे म्हणाला आहे की, 'या आजींबरोबर एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे ज्याठिकाणी त्या देशातील महिलांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देतील'

Published by: Meenal Gangurde
First published: July 27, 2020, 8:53 AM IST

ताज्या बातम्या