दीपिका-आलिया ते अगदी बिग बी... या बॉलिवूडकरांना सार्वजनिक ठिकाणी कोसळलं होतं रडू

दीपिका-आलिया ते अगदी बिग बी... या बॉलिवूडकरांना सार्वजनिक ठिकाणी कोसळलं होतं रडू

बिग बॉसच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये सलमान खान भावुक झाला होता. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी भावुक झालेला सलमान हा काही पहिलाच अभिनेता नाही आहे, याआधी देखील अनेक बॉलिवूड कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी रडू कोसळलं आहे

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी: बिग बॉसमध्ये (Bigg Boss) नुकत्याच झालेल्या भागात सलमान खान (Salman Khan) भावुक झाला होता.या भागात रूबीना दिलैक-अभिनव शुक्ला, जास्मिन भसीन-अली गोनी हे गार्डन एरियात होते, हे चौघे एकमेकांना निरोप देत रडत होते. अभिनव आणि जास्मिनला सलमान पुढे यायला सांगतो. ते दोघं रेड बॉक्समध्ये असतात. सलमान त्यांची माफी मागतो आणि पहिल्यांदा सलमान कॅमेरासमोर रडतो. या भागात जस्मिन भसीन एव्हिक्ट झाल्याने सलमान खान भावुक झाला होता. अली गोनीदेखील भावुक झाल होता. पण सलमान खान (Salman Khan) अशाप्रकारे रिअॅलिटी शोमध्ये भावुक झाल्याचेे पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांनी पाहिले असेल. दरम्यान  अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी भावुक झालेला सलमान हा काही पहिलाच अभिनेता नाही आहे,  याआधी देखील अनेक बॉलिवूड कलाकार सार्वजनिक ठिकाणी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

1) दीपिका पादूकोण

दीपिका पादूकोण (Deepika Padukon) छपाक (Chhapaak) या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी भावुक झालेली पाहायला मिळाली होती. जानेवारी 2020 मध्ये या चित्रपटाचा  संपूर्ण ट्रेलर पाहिल्यानंतर ती भावुक झाली होती. या सिनेमात तिने ॲसिड अटॅक पीडितेची भूमिका केली होती.

2) नीलम कोठारी

नेटफ्लिक्सवरील 'Fabulous Lives of Bollywood Wives' या कार्यक्रमात भावुक झालेली पाहायला मिळाली. आपल्या पडत्या काळात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांनी केलेल्या मदतीबद्दल बोलताना ती भावुक झाली होती. याचबरोबर शाहरुख आणि गौरीबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना देखील नीलम(Neelam Kothari) भावूक झाली होती.

3) आलिया भट्ट

2019 मध्ये  We The Women Asia summit मध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या आणि बहिणीच्या अवघड काळातील परिस्थितीविषयी बोलताना भावुक झाली होती. डिप्रेशनमध्ये असताना दोघींना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे देखील तिने सांगितले. या कार्यक्रमात शाहीन (Shaeen Bhatt) हिच्या I’ve Never Been (Un)Happier या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

4)अमिताभ बच्चन

2018 च्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन(Amitabh Bachhan) भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. बच्चन यांच्या वाढदिवशी चॅनेलने एक व्हिडीओ क्लिप तयार केली होती. यामध्ये अमिताभ त्यांच्या आईचा तेजी बच्चन यांचा आवाज ऐकून भावूक झाले होते. चॅनेलने दिलेल्या या प्रेमळ सरप्राइजमुळे देखील बच्चन भावूक झाले होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 13, 2021, 5:48 PM IST

ताज्या बातम्या