रानू मंडल नाही तर 'ही' आहे स्टेशनवर गाणं गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर, अनुराग कश्यपनं दिली होती संधी

सिंगर हिमेश रेशमियाप्रमाणेच दिग्दर्शक अनुराग कश्यपने सुद्धा अशाच प्रकारे स्टेशनवर गाणाऱ्या एका मुलीला आपल्या सिनेमात गाणं गाण्याची संधी दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 08:17 AM IST

रानू मंडल नाही तर 'ही' आहे स्टेशनवर गाणं गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर, अनुराग कश्यपनं दिली होती संधी

मुंबई, 15 सप्टेंबर : सध्या बॉलिवूड म्युझिक कंपोझर आणि सिंगर हिमेश रेशमिया रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानू मंडल यांना सिनेमासाठी गाण्याची संधी दिल्यानं खूप चर्चेत आहे. रानू पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागत असत. पण एतींद्र चक्रवर्ती नावाच्या एका मुलाने त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हिमेशने त्यांना आपल्या सिनेमात गाण्याची संधी दिली आणि त्यांचं अवघ जीवनच बदलून गेलं मात्र असं करणारा हिमेश पहिलाच बॉलिवूड सेलिब्रेटी नाही याआधी दिग्दर्शक अनुराग कश्यपने सुद्धा अशाच प्रकारे स्टेशनवर गाणाऱ्या एका मुलीला आपल्या सिनेमात गाणं गाण्याची संधी दिली होती.

अनुराग कश्यप दिग्दर्शित सिनेमा गँग्स ऑफ वासेपुरची सर्वत्र खूप चर्चा झाली होती. खासकरून या सिनेमातील गाणं दिल छीछलेदर खूप हिट झालं होतं. उत्तर भारतीय अंदाजातलं हे गाणं मुंबईच्या सायन स्टेशनवर गाणाऱ्या 16 वर्षीय दुर्गानं गायलं होतं. आंध्रप्रदेशची रहिवासी असलेल्या दुर्गाला 2 लहान बहिणी आहेत. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी दुर्गा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर गाणी गात असे.

'स्वराज्य जननी जिजामाता'मध्ये छोट्या जिजाऊंनी केलं धाडस कारण...

रानू मंडल ज्याप्रमाणे राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाताना एतींद्र चक्रवर्तीला दिसली होती आणि त्याने तिचा व्हिडीओ बनवला. तसंच रेल्वे स्टेशनवर गाताऱ्या दुर्गाचं टॅलेंट निर्माता आनंद सुरपूर यांनी ओळखलं होतं. त्यांच्यासोबत दुर्गानं 2 वर्षं काम केलं. तसेच त्यांनी दुर्गाचा एक अल्बम सुद्धा रिलिज केला. त्याचवेळी म्युझिक डायरेक्टर स्नेहा खानवालकर दुर्गाच्या आवाजानं प्रभावित झाल्या आणि त्यांनी दुर्गा बद्दल अनुरागला सांगितलं. त्यानंतर गँग्स ऑफ वासेपूर चं गाणं दिल छीछालेदर हे गाणं दुर्गा गाणार असं ठरलं.

Loading...

Bigg Bossमध्ये होणार 'हे' बदल, सलमानच्या मानधनापासून ते थीमपर्यंत सर्वच चर्चेत

4-5 दिवसात रेकॉर्ड झालं होतं दिल छीछालेदर गाणं

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुर्गाच्या आवाजातलं दिल छीछालेदर हे गाणं 4 ते 5 दिवसात रेकॉर्ड झालं होतं. म्युझिक कंपोझर स्नेहा खानवालकर आणि त्यांचा भाऊ यांच्या मदतीनं या गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण करण्यात आलं.

या गाण्याच्या अनुभवाविषयी बोलताना दुर्गा म्हणाली होती, मी कधीच विचार केला नव्हता की मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर गाऊ शकेन. मी खूप खुश आहे आणि मला खूप चांगलही वाटत आहे.

VIDEO श्रेया घोषालनं साथसंगतीशिवाय गायलेलं 'ते' एव्हरग्रीन गाणं झालं VIRAL

========================================================

जीव वाचवण्यासाठी सशाची धडपड पण बिबट्यानं केली शिकार, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 08:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...