क्रिती, सारानंतर आता या अभिनेत्रीला डेट करतोय सुशांत सिंग राजपूत?

क्रिती, सारानंतर आता या अभिनेत्रीला डेट करतोय सुशांत सिंग राजपूत?

या सगळ्यात शांत राहिल तो सुशांत कसा क्रितीनंतर त्याचं नाव जोडलं गेलं ते सारा अली खानसोबत.

  • Share this:

मुंबई, 11 मे- सुशांत सिंग राजपुत हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येते ती अभिनेत्री अंकिता लोखंडे. एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेदरम्यान दोघं पहिल्यांदा भेटले होते. नात्यात आल्यानंतरही दोघं अनेक वर्ष लिव्हइनमध्ये राहत होते. मात्र या दोघांच्या नात्यात क्रिती सेनन आली आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले. 'राबता' सिनेमाच्यावेळी सुशांत आणि क्रितीची ओळख झाली. दोघांनी अनेकवेळा ते फक्त चांगले मित्र असल्याचं म्हटलं.

…म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्या रायचा दरवाजा वाजवत होता

अनेकवर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. या सगळ्यात शांत राहिल तो सुशांत कसा क्रितीनंतर त्याचं नाव जोडलं गेलं ते सारा अली खानसोबत. पण दोघांनीही ही फक्त अफवा असल्याचं म्हटलं. आता पुन्हा एकदा सुशांत अफेअरमुळे चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत सध्या अभिनेत्री रेहा चक्रवर्तीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना एकमेकांना भेटून काही दिवसही झाले नसल्यामुळे दोघांना आपल्या नात्याचा इतक्यात खुलासा करायचा नाही.

आपल्या सावत्र आईपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे 'ही' अभिनेत्री

सुशांत आणि रेहा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. पण दुसरीकडे ते आपण फक्त चांगले मित्र असल्याचंच सांगत आहेत. दरम्यान, दोघं सुशांतच्या लोणावळ्याच्या घरी सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.

VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

सध्या सुशांत सिंग 'छिछोरे' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. यात तरुण आणि म्हातारपणीचा सुशांत दिसत आहे. याआधी सुशांत 'सोनचिडिया' सिनेमात दिसला होता. चंबळच्या खोऱ्यातील कुख्यात गुंडांवर सिनेमाची कथा आधारित होती. अभिषेक चौबे दिग्दर्शित या सिनेमात सुशांतसोबत भूमी पेडणेकर, रणवीर शौरी, मनोज वाजपेयी यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2019 02:25 PM IST

ताज्या बातम्या