विरोध 'टायगरला' नाही यशराजच्या दादागिरीला- मनसेचं 'देवा' वादावर स्पष्टीकरण

विरोध 'टायगरला' नाही यशराजच्या दादागिरीला- मनसेचं 'देवा' वादावर स्पष्टीकरण

तर पाचातील दोन शोज देवाला मिळावे अशी मागणी अंकुश चौधरी यांनी केली आहे.

  • Share this:

20 डिसेंबर:   टायगर जिंदा है आणि देवा चित्रपटाच्या वादात आता नवीन वळण आलं आहे. देवाला थिएटर मिळावं म्हणून पत्र लिहिणाऱ्या मनसेने आज देवा- टयगर झिंदा है वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपला विरोध सिनेमाला नाही तर  यशराज फिल्मस्च्या दादागिरीला असल्याचं  मनसे प्रवक्ते अमेय खोपकर म्हणाले .

आम्ही काल लिहिलेल्या विरोधानंतर आम्ही टायगर झिंदा हैच्या विरोधात आहोत असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण तसं नाही आहे. हिंदी सिनेनिर्मात्यांच्या दादागिरीला आमचा विरोध आहे अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे. तर पाचातील दोन शोज देवाला   मिळावे अशी मागणी अंकुश चौधरी यांनी केली आहे. जर ही मागणी पूर्ण केली नाही तर खळ्ळखट्ट्याक केलं जाईल असंही ते म्हणाले.

हे दोन्ही चित्रपट येत्या २२ तारखेला प्रदर्शित होणार आहेत. पण यशराज फिल्म्सचा आक्रमकपणा असा, की बहुतांश स्क्रीन्स 'टायगर जिंदा है'साठी आरक्षित झालेत. यावर काँग्रेस नेते नितेश राणे यांंनीही टीका केली आहे.  यामुळे मराठी चित्रपट देवाला चित्रपटगृहच मिळत नाहीत. मल्टिप्लेक्समध्ये ही समस्या आहेच, पण खुद्द प्लाझा, चित्रा आणि स्टारसिटीमध्येही देवाला शोज मिळत नाहीयेत. यामध्ये आता मनसेनंही उडी घेतली होती. देवा या चित्रपटाला स्थान द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं ती मिळवून देऊ, अशं धमकीवजा पत्रच मनसे चित्रपट सेनेनं काढलं होतं .

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 12:33 PM IST

ताज्या बातम्या