Oops! ‘पछताओगे’ सक्सेस पार्टीमध्ये नोरा फतेहीला ड्रेसनं दिला दगा, VIDEO VIRAL

Oops! ‘पछताओगे’ सक्सेस पार्टीमध्ये नोरा फतेहीला ड्रेसनं दिला दगा, VIDEO VIRAL

विकी कौशल आणि नोरा फतेही यांच्या ‘पछताओगे’ गाण्याची सध्या सोशल मीडियावर धूम आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : विकी कौशल आणि नोरा फतेही यांच्या ‘पछताओगे’ गाण्याची सध्या सोशल मीडियावर धूम आहे. या गाण्याची फक्त लिरिक्सच नाही तर विकी आणि नोरा यांच्यातील केमिस्ट्रीनं सुद्धा प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आत्तापर्यंत या गाण्याचा व्हिडीओ 3 कोटी 88 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यावरूनच या गाण्याची लोकप्रियता लक्षात येते. हे गाणं सुपरहिट झाल्यानंतर एका सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या सक्सेस पार्टीमध्ये विकी कौशलसोबत डान्स करत असताना नोरा फतेहीला तिच्या ड्रेसमुळे लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागला.

नोरा आणि विकीचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नोरा आणि विकी एकमेकांचा हात पकडून डान्स करताना दिसत आहेत. मात्र या दरम्यान एका स्टेपच्या वेळी नोरा मागे झुकते तेव्हा आपल्या शॉर्ट ड्रेसमुळे तिला अनकन्फर्टेबल होते आणि ड्रेस ठीक करु लागते. नेमका हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी नोरानं बेबी पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता तर विकी ब्लॅक कलरच्या जॅकेटमध्ये दिसला.

ब्रेकअपच्या चर्चांनंतर आमिर खानच्या लेकीनं शेअर केला बॉयफ्रेंड सोबतचा 'तो' फोटो

डिनर टेबलवरील मोबाइल मेसेजपासून सुरू झालेली या गाण्याच्या कथेत विकीची भूमिका खूपच प्रामाणिक आणि सोज्वळ भासते. विकीच्या ही व्यक्तीरेखा प्रेमासाठी काहीही करु शकणाऱ्या प्रियकराची आहे. पछताओगे हे गाणं अरजित सिंहनं गायलं असून याचं दिग्दर्शन अरविंद खैरा यांनी केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रेम आणि विश्वासघात यांचं कॉम्बिनशन दाखवण्यात आलं आहे. याचं शूटिंग शिमलामध्ये झालं आहे.

मुलीनं दिलं होतं वाऱ्यावर सोडून, VIRAL VIDEO मुळे प्रसिद्धी मिळाली आणि...

=======================================================================

VIDEO: 'जसा मुंगळा गुळाला चिकटून बसतो...' अमोल कोल्हेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

First published: August 28, 2019, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading