'मैं सलमान की दिवानी हूं' नोरा फतेहीनं व्यक्त केल्या मनातल्या भावना

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोरानं सलमानची खूप स्तुती केली.

News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 08:14 PM IST

'मैं सलमान की दिवानी हूं' नोरा फतेहीनं व्यक्त केल्या मनातल्या भावना

दिलबर दिलबर आणि कमरिया सारख्या सुपरहिट आयटम साँगमधून आपल्या डान्स मूव्सनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही सध्या बॉलिवूमधील सर्वच दिग्दर्शकांची पहिली पसंती बनली आहे. तिच्या डान्सिंग स्किलनं तिनं स्वतःची वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. पण आता ती ती अभिनय क्षेत्रातही आपलं नशीब आजमवत आहे.

नोरा फतेही लवकरच सलमानच्या बहुप्रतीक्षित 'भारत' सिनेमामध्ये अभिनय करताना दिसणार आहे. या सिनेमात ती सुनील ग्रोव्हरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. यासोबतच ती काही सीनमध्ये सलमान खानसोबतही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच ती भारतमधील तुरपिया गाण्यावरही थिरकताना दिसणार आहे.

27 वर्षीय नोरा फतेही सलमान सोबत काम करायला मिळाल्यानं यावेळी खूप खूश आहे. सलमान बद्दल बोलताना नोरा सांगते, माझ्यासाठी हे सर्व स्वप्नवत आहे. सलमानसोबत स्क्रीन शेअर करणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Loading...

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोरानं सलमानची खूप स्तुती केली. ती म्हणाली, सलमान खूप मेहनती आहे आणि सोबतच तो चांगला सहकलाकार आहे. तो नवीन कलाकारांना खूप प्रोत्साहन देतो आणि त्याच्या बद्दल खास गोष्ट अशी आहे की, तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आम्ही खूप एंजॉय केलं.

नोरा पुढे म्हणाली सर्वांनाच माहीत आहे की, जिथे सलमान आहे तिथे मस्ती आणि एंजॉय होणारच. मला सलमान आणि सुनील ग्रोवरकडून बऱ्याच नव्या गोष्टी शिकले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की मला सलमानसोबत पुन्हा काम करायची संधी मिळेल.

नोराच्या मते, भारत हा सिनेमा तिच्या आयुष्यातील खूप मोठी संधी होती. ती सांगते, सलमान सोबत काम करणं हे देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. भारत व्यतिरिक्त नोरा 'बाटला हाऊस' आणि रेमो डिसोझाच्या स्ट्रीट डान्सरमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...