VIDEO : नोरा फतेही आणि रेमो डिसूझामध्ये अवॉर्डसाठी झटापट, अभिनेत्रीला कोसळलं रडू

VIDEO : नोरा फतेही आणि रेमो डिसूझामध्ये अवॉर्डसाठी झटापट, अभिनेत्रीला कोसळलं रडू

या व्हिडीओमध्ये नोरा रडत रडत 'नो कॅमेरा प्लिज' असं म्हणून मिडियापासून दूर जाताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनय क्षेत्रातले महत्त्वाचे अवॉर्ड मिळवण्याचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. असंच स्वप्न आहे अभिनेत्री नोरा फतेहीचं जे कोरिओग्राफर रेमो डिसूझामुळे पूर्ण होऊ शकलेलं नाही. फार कमी काळात आपल्या डान्सिंग स्कीलमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण सध्या तिची असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एका अवॉर्डसाठी नोरा आणि रेमो डिसूझामध्ये झटापट झालेली पाहायला मिळत आहे.

नोरा फतेही आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नोरा आणि रेमो एकाच अवॉर्डसाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. नोरा फतेही अवॉर्ड ट्रॉफी हातात घेऊन स्पीच देताना दिसत आहे. ती म्हणते, ‘मी बरेच दिवस याची वाट पाहिली होती. माझ्या बाटला हाऊस आणि स्ट्रीट डान्सरमधील बेस्ट परफॉर्मन्ससाठी मी नक्कीच हा अवॉर्ड डिझर्व्ह करते. मी माझी आई, कुटुंब, भारतीय चाहते आणि मोरक्कोला धन्यवाद देते.’

सारा अली खानला करिनानं असं काय विचारलं, ज्यानंतर तिला वाटली सैफची भीती

 

View this post on Instagram

 

Fierce #SD3 #StreetDancer3D @marcepedrozo @jerrydsouza6486 @suzan1304 @anups_

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

नोरा फतेहीचं हे स्पीच सुरू असतानाच रेमो डिसोझा त्याठिकाणी येतो आणि तिच्या हातातली ट्रॉफी खेचून घेतो. हा अवॉर्ड माझा आहे असं तो नोराला सांगतो. ज्यामुळे नोरा आणि रेमोमध्ये भांडण होतं. अखेर रेमो तिच्या हातातला अवॉर्ड हिसकावून घेतो आणि तिथून निघून जातो. हे पाहिल्यावर नोराला रडू कोसळलं आणि ती नो कॅमेरा प्लिज असं म्हणत मिडियापासून दूर जाताना दिसत आहे.

तापासीला 1-2 नाही तर खावे लागले तब्बल एवढे ‘थप्पड’, वाचा पडद्यामागे काय घडलं

 

View this post on Instagram

 

WOW ... i was trying to have a moment...@remodsouza

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

नोरा आणि रेमोचा हा एक मजेदार व्हिडीओ आहे. जो स्वतः नोरानं तिच्या इन्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नोराच्या बॉलिवूड करिअर बद्दल बोलायचं तर तिनं आतापर्यंत 'दिलबर', 'कमरिया' आणि 'साकी साकी' हे आयटम साँग केले आहेत. याशिवाय ती अहमद खानच्या 'बागी 3' मध्येही स्पेशल आयटम साँग करताना दिसणार आहे.

लग्नाआधी 10 वर्षं रिलेशिपमध्ये होता अंकुश चौधरी, बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री

First published: February 7, 2020, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading