नोरा फतेहीला 2 शर्मा सिस्टर्सची टक्कर; अफलातून VIDEO यूट्यूबवर हिट

नोरा फतेहीला 2 शर्मा सिस्टर्सची टक्कर; अफलातून VIDEO यूट्यूबवर हिट

नोरा फतेही (Nora Fatehi)च्या नाच मेरी रानी (Nach Meri Rani) या गाण्यावर दोन बहिणींनी व्हिडीओ बनवला आहे. त्यांचा डान्स व्हिडीओ जबरदस्त हिट होत आहे. त्यांच्या डान्सचा जलवा एकदा पाहाच

  • Share this:

मुंबई, 02 नोव्हेंबर: बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्याच्या जोरावर नाव कमावणारी अभिनेत्री म्हणून नोरा फतेही(Nora Fatehi)चं नाव घेतलं जातं. नोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर धुमाकूळ घालत आहे. नाच मेरी रानी (Nach Meri Rani)या गाण्यावर नोराने जबरदस्त डान्स केला होता. इंटरनेटवर या व्हिडीओची इतकी क्रेझ आहे. की, नोरासारखा डान्स व्हिडीओ अनेकांनी अपलोड केला आहे. नाच मेरी रानी हे हाणं गुरू रंधावा (Guru Randhava)चं आहे.

नोराच्या डान्सची कॉपी

आपल्या डान्समुळे प्रसिद्ध झालेल्या दोन बहिणींनी नाच मेरी रानी या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. त्यांचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर हिट होत आहे. तानिया शर्मा आणि कृतिका शर्मा अशी या बहिणींची नावं आहेत. त्यांच्या व्हिडीओला अनेक लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

शर्मा सिस्टर्स या नावाने त्यांचं यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे. मुळ गाण्यामध्ये नोरा सुरुवातीला रोबोटच्या रुपात दिसते. या गाण्याला एक रोबोटिक टच मिळतो. नोराने शेअर केलेला व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला होता. तिचा व्हिडीओ पाहून अनेक जण त्या गाण्यावर स्वत:चा डान्स बसवत आहेत. सोशल मीडिया अनेक लोकांसाठी वरदान ठरलं आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरवर अनेक तरुण आपलं टॅलेंट दाखवत आहेत. त्यांना सोशल मीडिया नावाचा एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 2, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या