Home /News /entertainment /

VIDEO: नोराच्या तालावर थिरकले जपानी डान्सर्स; 'नाच मेरी रानी' गाण्यावर भन्नाट डान्स

VIDEO: नोराच्या तालावर थिरकले जपानी डान्सर्स; 'नाच मेरी रानी' गाण्यावर भन्नाट डान्स

बॉलिवूड डान्सर नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) नाच मेरी रानी (Nach Meri Rani) या गाण्यावर जपानी कलाकारांनी भन्नाट डान्स केला आहे.

  मुंबई, 16 नोव्हेंबर: बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध डान्सर म्हणून नोरा फतेहीचं (Nora Fatehi) नाव घेतलं जातं. नोरा फतेहीच्या अदा आणि तिच्या डान्स मूव्ह्ज पाहून अनेक चाहते घायाळ होतात. नोराची ही प्रसिद्धी फक्त देशापूर्तीच सीमित राहिलेली नाही. नोराच्या एका गाण्यावर चक्क जपानी ग्रूपने डान्स केला आहे. काही दिवसांपूर्वी नोरा फतेही आणि गुरू रंधावाने (Guru Randhava) नाच मेरी रानी (Nach Meri Rani) या गाण्याचा व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओमध्ये नोराचा डान्स पाहून भले भले गारद झाले होते. देशातील अनेकांनी तिच्या डान्सची कॉपी केली होती. 'नाच मेरी रानी' या गाण्यावर जपानी डान्सर्सचा ग्रूप थिरकला आहे. त्यांनी डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नोराने देखील हा व्हीडीओ शेअर केला आहे. एशियन डान्सर्स असं या ग्रूपचं नाव आहे. भाषा ओळखीची नसतानाही या ग्रूपला ते गाणं इतकं आवडलं की त्यांनी या गाण्यावर व्हिडीओ बनवला. अर्थात नाच मेरी रानी या गाण्यावर डान्स व्हिडीओ बनवणारा हा काही एकटा ग्रूप नाही. देशभरातील अनेक डान्सर्सनी या गाण्यावर डान्स केला आहे. अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
  गुरू रंधावाचा आवाज आणि नोराचा डान्स असं उत्तम कॉम्बिनेशन या गाण्यामध्ये जुळून आलं आहे. नोरा फतेही मुळची कॅनडाची नागरिक आहे. 2014 पासून नोरा भारतीय चित्रपटांमध्ये काम करत आहे. बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये नोरा फतेही सहभागी झाली होती. तेव्हा तिला देशभरात प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तिने रॉकी हॅन्डसम, सत्यमेव जयते, स्त्री, बाटला हाउस, मरजावां आणि स्ट्रीट डांसर 3डी या सिनेमांमध्ये तिने भन्नाट डान्स केला आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood actress

  पुढील बातम्या