मुंबई, 15 मार्च : अभिनेत्री नोरा फतेहीचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर होत असतात. गेल्या वर्षभरामध्ये तिची अनेक आयटम साँग तुफान व्हायरल झाली आहेत. तिचा‘दिलबर’ या गाण्यावरील परफॉरमन्स विशेष गाजला. याच गाण्याचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेली डान्सठीही नोरा फतेहीची एक विशेष ओळख आहे. याआधीही तिने बेली डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.
नोरा फतेहीचा हा व्हिडिओ तिच्या इन्साग्रामवरील एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा डान्स व्हिडीओला हजारो युजर्सनी पाहिला आहे. नोरा फतेहीच्या या डान्समुव्ह्स पाहून तिचे अनेक चाहते घायाळ झाले आहे.
फार कमी कालावधीत आपल्या डान्सिंग स्कीलमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पॅरिसमधील ‘एल ऑलंपिया ब्रुनो कोक्वाट्रिक्स’मध्येही नोराने शानदार परफॉर्मन्स केला होता. यावेळीही तिने आपल्या देसी अदा पॅरिसमधील चाहत्यांना दाखवल्या होत्या. दाक्षिणात्य सिनेमातही नोराने नाव कमावलं आहे. नोराच्या बॉलिवूड करिअर बद्दल बोलायचं तर तिनं आतापर्यंत 'दिलबर', 'कमरिया', 'हाय गरमी' आणि 'साकी साकी' हे आयटम साँग केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.