मुंबई, 21 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. लॉकडाऊन असतानाही नेरा तिच्या सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. तिचे सर्वच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. पण नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे जो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 11 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नोराच्या डान्स स्टेपसोबतच तिची डान्स स्टाइल आणि एनर्जी सुद्धा कमालीची आहे. या व्हिडीओमध्ये नोरा ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यात तिचा लुक नेहमीपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना नोरानं लिहिलं, 'क्या बात, खूप साऱ्या नोरियाना. तर हा आहे माझा टिक टॉक डेब्यू मला itsnoriana वर फॉलो करा.' नोराच्या या डान्स व्हिडीओचं सर्वजण खूप कौतुक करताना दिसत आहेत. याआधीही नोरानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती धम्माल डान्स करताना दिसली होती.
Lockdown मध्ये कार्तिक आर्यनला रोज खावा लागतोय बहिणीचा मार, शेअर केला Video
View this post on Instagram
अभिनेत्री नोरा फतेहीनं तिच्या डान्स स्टाइलमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिनं आतापर्यंत में 'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी', 'एक तो कम जिंदगानी' आणि 'गर्मी सॉन्ग' या गाण्यांवर डान्स केला आहे. तिची ही सर्वच गाणी लोकप्रिय झाली. नोरानं चाहत्यांची मनं जिंकण्यात कोणताही कसर सोडलेली नाही. नोरा सध्या लॉकडाऊनमुळे घरीच आहे मात्र तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसते.
(संपादन : मेघा जेठे)
रामायणच्या सीतेला साकारायची आहे निर्भयाच्या आईची भूमिका, कारण वाचून कराल सॅल्यूट
बॉलिवूड स्टार्सची स्टाइल 10 वर्षांपूर्वी होती अशी, PHOTOS पाहून पोट धरुन हसाल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood