नेहा धुपियाच्या पतीसोबत का झालं होतं ब्रेकअप, अखेर नोरा फतेहीने केला खुलासा

माझ्यासाठी तो सर्वात कठीण काळ होता. कारण मी कधी याची कल्पनाही केली नव्हती. मी फार अस्वस्थ झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 04:47 PM IST

नेहा धुपियाच्या पतीसोबत का झालं होतं ब्रेकअप, अखेर नोरा फतेहीने केला खुलासा

मुंबई, १३ एप्रिल- अंगद बेदी आणि अभिनेत्री नेहा धुपियाने गेल्यावर्षी लग्न केलं. मीडिया रिपोर्टनुसार, नेहाशी लग्न करण्याआधी अंगद नोरा फतेहीला डेट करत होता. रिपोर्टनुसार, अंगदने नोराला नात्यात धोका दिला होता. त्यामुळे नोराने ब्रेकअप केलं होतं. ब्रेकअपनंतर दोघांनी याबद्दल कधीही वाच्यता केली नाही. पण आता नोरा ब्रेकअपबद्दल मोकळेपणाने बोलली.


‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नोरा म्हणाली की, ‘प्रत्येक मुलगी या कठीण प्रसंगातून एकदा तरी जातेच. माझ्यासाठी तो सर्वात कठीण काळ होता. कारण मी कधी याची कल्पनाही केली नव्हती. मी फार अस्वस्थ झाले होते. मी साधारण दोन महिने नैराश्यग्रस्त होते. पण या अनुभवाने मला खूप बदललं आहे. एक वेळ अशी आली होती की करिअरबाबतीतही मी फार निराश झाले होते. पण त्यानंतर मी स्वतःला सावरलं आणि करिअरमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा नव्याने उभी राहिले. मला पुन्हा एकदा जोमात काम करून स्वतःला सिद्ध करायचं होतं. जर ते ब्रेकअप झालं नसतं तर माझं कामासाठीचं पॅशन पुन्हा कधी परत आलं नसतं.’


नोराने जन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात आयटम साँग केलं होतं. दिलबर- दिलबर या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली होती. या सिनेमानंतर नोराकडे अनेक गाण्यांच्या ऑफर यायला लागल्या. सध्या ती वरुण धवनच्या ‘ABCD 2’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

Loading...

VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार, मनसेला म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...