'या' अभिनेत्रीनं विकी कौशलचा प्रेमात केला घात, VIDEO VIRAL

'या' अभिनेत्रीनं विकी कौशलचा प्रेमात केला घात, VIDEO VIRAL

गर्लफ्रेंड हरलीन सेठीशी ब्रेकअप झालं त्यानंतर विकी कौशलचं नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : अभिनेता विकी कौशल मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड हरलीन सेठीशी ब्रेकअप झालं त्यानंतर त्याचं नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं मात्र यावर त्यानं कधीच काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र नुकतंच विकीला नोरा फतेहीनं प्रेमात धोका दिल्याचं समजतं. काळजी करू नका. हा काही खरा खुरा प्रेमभंग नाही. तर आम्ही विकी आणि नोराचं नवं गाणं पछताओगे बद्दल बोलत आहोत. विकी आणि नोराचं हे गाणं टी-सीरिजनं युट्यूबवर नुकतंच रिलीज केलं. ज्याला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

विकी कौशल आणि नोरा फतेही पहिल्यांदाच या गाण्याच्या माध्यामातून एकत्र काम करत आहेत. हे एक रोमँटिक इमोशनल साँग आहे. ज्यात विकी आणि नोराची हॉट केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये हे दोघंही सिझलिंग आणि पॅशनेट अंदाजात दिसत आहेत. हे गाण बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरजित सिंगनं गायलं असून यामध्ये नोरा फतेहीचं प्रेमात विकी कौशलला धोका देणं सुद्धा खूपच सुंदर पद्धतीनं दाखवलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन अरविंद खैरा यांनी यांनी केलंअसून त्यांनी प्रेम आणि विश्वासघाताचं चित्रण केलं आहे.

VIDEO फॅशन शो दरम्यान पाय अडखळून रँपवरच पडली असती ही प्रेग्नंट अभिनेत्री...

अरविंद सांगतात, नोरा आणि विकी यांच्यासोबत शूट करताना खूपच मजा आली. दोघांनीही खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्हाला या गण्यातील इमोशन्स व्हिडीओच्या माध्यमातून दाखवायचे होते आणि त्यासाठी विकी आणि नोरा दोघांनीही खूप मेहनत घेतली.या व्हिडीओमध्ये दिसत असलेली शिमला मधील गल्ली आणि तिथलं आर्किटेक्चर या गाण्याच्या कथेला साजेसं आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये पुन्हा बदल, दिसणार हा नवीन चेहरा

साकी साकी सारख्या अनेक हिट आयटम साँगमधून नोरानं खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. सध्या ती बॉलिवूडची आयटम क्वीन म्हणून ओळखली जाते. मात्र या अल्बम साँगमधील तिचा अंदाज नेहमीपेक्षा खूपच वेगळा होता आणि विशेष म्हणजे तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला.

एक दिवसासाठी पंतप्रधान झाल्यास, प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम

विकी बद्दल बोलायचं तर तो सध्या एका मागोमाग हिट सिनेमा दिल्यानं बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. काही दिवसांपूर्वीच्या उरी सिनेमातील त्याच्या अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. लवकरच तो मानेक शॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

===================================================================

SPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या