मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'काटे नही कटते' वर नोरा-टेरेन्सचा जबरदस्त डान्स; बोल्ड VIDEOने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

'काटे नही कटते' वर नोरा-टेरेन्सचा जबरदस्त डान्स; बोल्ड VIDEOने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

प्रेक्षक नोरला  'इंडियाज बेस्ट डान्सर'  (Indias Best Dancer)  च्या मंचावर पाहुणी म्हणून पाहतील. जिथे ती कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत  (Terence Lewis)  धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे.

प्रेक्षक नोरला 'इंडियाज बेस्ट डान्सर' (Indias Best Dancer) च्या मंचावर पाहुणी म्हणून पाहतील. जिथे ती कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत (Terence Lewis) धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे.

प्रेक्षक नोरला 'इंडियाज बेस्ट डान्सर' (Indias Best Dancer) च्या मंचावर पाहुणी म्हणून पाहतील. जिथे ती कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत (Terence Lewis) धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे.

मुंबई, 26 नोव्हेंबर- नोरा फतेही   (Nora Fatehi)  एक उत्कृष्ट डान्सर आहे. ती तिच्या जबरदस्त मूव्ह्सने लोकांना भुरळ पाडते. आपल्या नृत्यकौशल्य आणि तल्लख व्यक्तिमत्वामुळे तिने बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे. ती डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे. यावेळी प्रेक्षक तिला 'इंडियाज बेस्ट डान्सर'  (Indias Best Dancer)  च्या मंचावर पाहुणी म्हणून पाहतील. जिथे ती कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत  (Terence Lewis)  धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे.

सोनी टीव्हीने या शोचा एक प्रोमो व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला नोरा आणि टेरेन्स श्रीदेवीचं प्रसिद्ध गाणं 'काटे नही कटते ' वर धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्रीचे चाहते व्हिडिओवर कमेंट करून तिच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत आणि तिच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक करत आहेत.यामध्ये टेरेन्स आणि नोरा फारच हॉट अंदाजात दिसून येत आहेत. याआधीही डान्स रियालिटी शोमध्ये नोरा आणि टेरेन्स डान्स करताना दिसले आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना फारच पसंत पडते. अनेकवेळा शोमध्ये टेरेन्स नोरावर फिदा असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान दोघांचा घ डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नोराचा आणि टेरेन्सचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने थाई हाय स्कर्टसह क्रॉप टॉप घातला आहे. या स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेत्री नोरा अभिनेता चंकी पांडे, नीलम कोठारी आणि दिव्या खोसला कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहे.नोराच्या डान्सचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर च्यारलं होत असतात. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून डान्ससोबतच मजेदार व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नोरा फतेही शेवटची 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसली होती.

(हे वाचा:Bigg Boss 15: जय, विशाल आणि नेहाचं Shocking Eviction; तर हे दोन स्पर्धक झाले... )

'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोचा दुसरा सीझनही पहिल्या सीझनप्रमाणेच पसंत केला जात आहे. यावेळीही शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक दिसत आहेत. स्पर्धक आपल्या धमाकेदार डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना तसेच जजना चकित करत आहेत. मलायका अरोरा या शोमध्ये गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्यासोबत जजच्या भूमिकेत दिसून येत आहे.

First published:

Tags: Entertainment, Nora fatehi