S M L

#MeTooबद्दल अमिताभ बच्चन काय म्हणतायत पहा

बिग बी म्हणाले, 'कुठल्याही महिलेशी गैरवर्तन होताच कामा नये. आणि असं झालंच तर तात्काळ आवाज उठवला पाहिजे. त्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.'

Updated On: Oct 11, 2018 03:48 PM IST

#MeTooबद्दल अमिताभ बच्चन काय म्हणतायत पहा

मुंबई, 11 आॅक्टोबर : तनुश्री-नाना प्रकरणानंतर #MeTooची चळवळ जोर धरायला लागलीय. नाना पाटेकरानंतर आता कैलाश खेर, रजत कपूर, आलोकनाथ अशी अनेक नावं बाहेर यायला लागली. या चळवळीवर अमिताभ बच्चन यांनी आपलं मत व्यक्त केली.

बिग बी म्हणाले, 'कुठल्याही महिलेशी गैरवर्तन होताच कामा नये. आणि असं झालंच तर तात्काळ आवाज उठवला पाहिजे. त्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.'

अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय, ' हल्ली अनेक आॅफिसेसमध्ये महिलांची संख्या वाढतेय, ही चांगली गोष्ट आहे. पण कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसणं चुकीचं आहे. महिलांना आत्मसन्मानानं काम करण्याचा अधिकार आहे.'बाॅलिवूडच्या शहेनशहानं सांगितली ही जागरुकता शाळेपासूनच निर्माण करायला हवी. महिला आणि मुलांना स्वरंक्षणाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. महिलांना करियरमध्ये सगळ्या संधी मिळाल्या पाहिजेत.

मीटू मोहिमेमुळं बॉलिवूडमध्ये वादळ आलं आहे. त्यावर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा त्यानं सोडला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने स्वतः याबाबत माहिती दिली.

ज्या व्यक्तीसोबत सिनेमा करणार होतो त्याच्यावरील लैंगिक छळाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं या चित्रपटातून बाजूला होत असल्याचं आमिरनं म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करत असल्याचं आमिरनं सांगितलं आहे.

Loading...
Loading...

लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या सिनेमातून आमिर खानने काढता पाय घेतला आहे. आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूर याच्या 'मुगल' या आगामी सिनेमात आमिर काम करणार होता पण त्याने आता सिनेमा सोडला आहे.

अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या, शेअर केला फॅमिली फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 03:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close