ऋषी कपूर बॉलिवूडच्या नव्या पिढीवर संतापले

ऋषी कपूर बॉलिवूडच्या नव्या पिढीवर संतापले

विनोद खन्ना यांच्या अंत्ययात्रेला बाॅलिवूडची नवी पिढी उपस्थित नव्हती, याबद्दल ऋषी कपूर भयंकर रागावलेत.

  • Share this:

28 एप्रिल : विनोद खन्नाच्या मृत्यूमुळे ऋषी कपूर खूपच दु:खी आहेत. ते फक्त दु:खी नाहीत तर रागावलेही आहेत. आणि हा राग आहे नव्या पिढीबद्दल. विनोद खन्ना यांच्या अंत्ययात्रेला बाॅलिवूडची नवी पिढी उपस्थित नव्हती, याबद्दल ऋषी कपूर भयंकर रागावलेत.

त्यांनी असंही म्हटलंय की त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना खांदा द्यायला कुणी येणार नाही.

ते म्हणतात, आदल्या रात्री प्रियांका चोप्राच्या पार्टीत सगळे जण होते. पण विनोद खन्नासाठी कुणीच आलं नाही.

विनोद खन्नाना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. पण शाहरूख, सलमानसारखे स्टार्स पोचले नाहीत.

सलमान खाननं 'दबंग'च्या शूटिंगवेळचे फोटो ट्विट करून विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिलीय.

First published: April 28, 2017, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading