13 डिसेंबर : ईफ्फी महोत्सवातून बाहेर काढण्यात आलेल्या 'न्यूड' या सिनेमाचा शो केरळ महोत्सवातही होऊ शकलेला नाही. खुद्द सिनेमाचा दिग्दर्शक रवी जाधव यानेच ही गोष्ट त्याच्या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलीय.
हा सिनेमा केरळ महोत्सवासाठी निवडण्यात आल्यानंतर तो रिसतर सेन्सॉर करून मगच महोत्सवात दाखवण्याच्या सूचना केरळ सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार हा सिनेमा सेन्सॉरसाठी पाठवण्यात आला. मात्र या सिनेमाला युए की ए सर्टीफिकेट द्यायचं यावरून सेन्सॉरच्या सदस्यांमध्ये मतभेद झाल्याने अखेरचा निर्णय अध्यक्ष घेतील असं निर्मात्यांना सांगण्यात आलं. अखेर 8 तारखेपर्यंत अध्यक्षांचा निर्णय आला नसल्याने केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा शो होऊ शकला नाही.
केरळ महोत्सवातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपल्याला पूर्ण सहकार्य दिल्याचं रवीने मान्य केलंय. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या दिरंगाईचा फटका आता पुन्हा एकदा या सिनेमाला बसलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Keral film fest, Nude, Ravi Jadhav, केरळ फिल्म फेस्टिव्हल, न्यूड, रवी जाधव