लाखो फॉलोअर्स असूनही दिशा पाटनीला वाटते या एकाच गोष्टीची खंत

दिशा लवकरच सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 04:39 PM IST

लाखो फॉलोअर्स असूनही दिशा पाटनीला वाटते या एकाच गोष्टीची खंत

मुंबई, 25 मे : अभिनेत्री दिशा पाटनीनं अल्पावधी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावरही तिचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. बॉलिवूडमध्ये नव्यानं येऊन लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पाटनी. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेली दिशा नेहमीच तिचे कूल आणि हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सुशांत सिंग राजपूतबरोबर 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी दिशा लवकरच सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पण त्यापूर्वी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिशानं स्वतःच्या रिअल लाइफबद्दल एक खंत व्यक्त केली आहे.

दिशा पाटनी अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू असल्या तरीही ती तिची पर्सनल लाइफबद्दल बोलणं नेहमीच टाळताना दिसते. पण नुकत्याच एनडीएला दिलेल्या एका मुलाखातीत दिशा तिच्या पर्सनल लाइफमधील अनेक गोष्टींवर मोकळेपणानं बोलली. ती म्हणाली, 'सोशल मीडियावर माझे अनेक चाहते आहेत. माझ्या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंट मिळतात मात्र आता पर्यंत माझ्या खऱ्या आयुष्यात कोणत्याही मुलानं माझ्याशी फ्लर्ट केलेलं नाही आणि कधी कधी मला या गोष्टीची खंत वाटते.'
Loading...

 

View this post on Instagram
 

🐳🌸


A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा सांगते, आतापर्यंत माझ्या रिअल लाइफमध्ये कोणत्याही मुलानं मला हॉट म्हटलेलं नाही. कोणीही माझ्याशी फ्लर्ट केलेलं नाही किंवा तसा प्रयत्नही कोणी केला नाही. मी शालेय वयात मी काहीशी टॉम बॉय सारखी राहत असे मी केस लहान ठेवत असे मुलांसारखे कपडे घालत असे आणि माझ्या घरातही मला कधी मुलीसारखं वागवलं गेलं नाही. मी 10 वीला गेल्यावर केस वाढवायला सुरूवात केली. मी शाळेत असताना खूप कमी बोलणारी आणि एकटी राहणारी एक शांत मुलगी होते. त्यामुळे कदाचित अशी कोणतीही गोष्ट माझ्याबाबतीत घडली नसेल.
 

View this post on Instagram
 

🌸🐡


A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

यावेळी दिशाला टायगर आणि तिच्या नात्याविषयी काही प्रश्न विचारण्यात त्यावर बोलताना दिशा म्हणाली, टायगर माझा खूप चांगला मित्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त या इंडस्ट्रीमध्ये माझा कोणीही मित्र नाही. आमच्या दोघांचीही स्वतःची काही स्वप्न आहे. आमच्या दोघांच्याही स्वभावात खूप अंतर आहे. मी खूप शांत आहे तर तो खूप हट्टी आणि आक्रमक आहे. पण असं असूनही आमच्या मैत्रीत काहीही फरक पडलेला नाही.


बिग बॉस 13 च्या स्पर्धकांची यादी झाली लिक, या कलाकारांच्या नावांची चर्चा


मोदी सरकारनंतर आता ‘टर्मिनेटर’ही परतला, 64 लाख वेळा पाहिला गेला हा VIDEO


टायगरला या खास नावानं हाक मारते कृती सेनन, काय असेल गर्लफ्रेंड दिशा पाटनीची प्रतिक्रिया?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...