इंदु सरकार'ला गांधी घराण्याकडून एनओसीची गरज नाही

इंदु सरकार'ला गांधी घराण्याकडून एनओसीची गरज नाही

इंदु सरकार या सिनेमाला गांधी कुटुंबियांकडून एनओसी घ्यायची गरज नाही असं म्हणण आहे सेन्साॅर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं.पहलाज निहलानी इंदु सरकारवर खूप खुश आहेत. त्यांनी आणीबाणीच्या गुपितांवरचा पडदा उचलल्याबद्दल मधुर भंडारकरचं अभिनंदन केलंय.

  • Share this:

 

स्वतंत्र भारताच्या इतिहासातला सगळ्यात काळा कालखंड म्हणजे आणीबाणी. या आणीबाणीच्या काळावर बेतलेल्या इंदु सरकार या सिनेमाला गांधी कुटुंबियांकडून एनओसी घ्यायची गरज नाही असं म्हणण आहे सेन्साॅर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं.

एरवी बायोपीकसाठी एनओसी घ्यायचा आग्रह धरणारे पहलाज निहलानी इंदु सरकारवर खूप खुश आहेत. त्यांनी आणीबाणीच्या गुपितांवरचा पडदा उचलल्याबद्दल मधुर भंडारकरचं अभिनंदन केलंय.

ते म्हणाले, 'भारताच्या इतिहासातलं एक अत्यंत लाजिरवाण प्रकरण म्हणजे आणीबाणी. या कालखंडात जगासमोर देशाची मान शर्मेनं झुकली होती. भारतीयांचे मनोधैर्य खचलं होत. अनेक मोठे नेते कैदेत गेले होते.'

हा चित्रपट 28 जुलैला रिलीज होतोय. एनओसीची गरज का नाही असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी वा संजय गांधी कुणाचीच नाव नाहीयेत.जर चित्रपटात कुणाची नाव असतील तर काय करायच ते आम्ही पाहू." सध्या तरी ते या चित्रपटावर खूप खुश आहेत.

 

First published: June 20, 2017, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading