मुंबई, 2 ऑक्टोबर : आज देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती आहे. देशभरात त्यांची जयंती साजरी केली जात आहे. राजकीय नेत्यांनीही आपल्या सोशल मीडियावरुन त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही त्यांच्या जयंतीनिमित्त गांधींजींचे सुविचार आदी बाबी शेअर केल्या आहे. यामध्ये सध्या अभिनेत्री रिचा चड्डाची पोस्ट व्हायरल झाली आहे. तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाधा साधला आहे.
सध्या सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांचा चरखा चालवितानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर रिचा चड्डा हिने जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. यावर रिचा म्हणते...ट्रेंड खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या पैशांचा वापर करता त्या नोटांवरही गांधीजींचाच फोटो आहे. तुम्ही कितीही विरोध केला तरी देशात आणि परदेशात जेथे भारताबद्दल बोललं जाईल तेथे गांधीचं आहेत. इच्छा नसली..विरोध असला तरी डोकं टेकावंच लागतं, नाही का? हेच गांधीजी आहेत!! सत्यमेव जयते..बापूंना नमन..
कितने भी तुम trend ख़रीदो,
जिस पैसे से ख़रीदोगे उसपे गांधी की ही फ़ोटो है! 😂
कितनी भी तुम गाली दे दो,
देश, विदेश जहाँ भारत की बात हो, वहाँ गांधी ही है... जहाँ ना भी हो, वहाँ भी गांधी है।
मन मार के ही सही, माथा टेकना तो पड़ता है न? यही गांधी है!
सध्या रिचाची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. फक्त देशातचं नाही तर परदेशातही महात्मा गांधींचं नाव तितक्यात आदराने घेतलं जातं. देशाच्या उन्नतीचा त्यांना एक वेगळा असा मार्ग होता. जातीभेद, धर्म, स्वराज्य आणि रामराज्य प्रस्थापित करण्यातील अडथळा आहेत, असे त्यांचे म्हणणे होते.