• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'चांदनी'च्या एक्झिटमुळे बाॅलिवूडमध्ये होळीचे रंग फिके, शबाना आझमींनी केलं ट्विट

'चांदनी'च्या एक्झिटमुळे बाॅलिवूडमध्ये होळीचे रंग फिके, शबाना आझमींनी केलं ट्विट

यंदा धुळवडीनिमित्त जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या घरी होणारी होळी पार्टी त्यांनी यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अधिकृत घोषणाच त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केलीय.

  • Share this:
27 फेब्रुवारी : श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सध्या शोकसागरात बुडालंय. त्यामुळेच यंदा  धुळवडीनिमित्त जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या घरी होणारी होळी पार्टी त्यांनी यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अधिकृत घोषणाच त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केलीय. खरं तर दरवर्षी शबाना आझमी यांच्या घरी होणाऱ्या होळी पार्टीनिमित्त त्यांचे इंडस्ट्रीतले मित्र आणि कुटुंबीय एकत्र जमतात .मात्र यंदा ही पार्टी होणार नसल्यानं बॉलिवूडमध्ये होळीचा रंग काहीसा फिका असेल हे स्पष्ट झालंय. श्रीदेवींनी आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी सिनेमांत रंग भरले. याच रंगांमध्ये प्रेक्षक न्हावून निघायचा. पण चांदनीच्या अकाली एक्झिटमुळे बाॅलिवूडचा रंगच फिका झालाय. यावेळी बाॅलिवूडमध्ये रंग उडवले जाणार नाहीत.
First published: