2001 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सेलेना जेटली फायनलिस्ट होती. सेलेनाने ‘फेमेना मिस इंडिया युनिव्हर्स’ हा किताब आपल्या नावावर केला आहे. तसेच सेलेनाने अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत. अशा या सुंदरीने 2003 मध्ये फिरोज खान यांच्या ‘जानशीन’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या अभिनेत्रीने नो एन्ट्री, सी कंपनी, हे बेबी, सूर्यम, टॉम, डिक एन्ड हेरी अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे. तसेच सेलेनाने एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम केलं आहे. (हे वाचा: भारती सिंगच नाही तर 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही घटवलं प्रचंड वजन, पाहा कोण आहे) आपल्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधणारी सेलेना अनेकवेळा आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. सेलेना तेव्हा मोठ्या प्रमणात चर्चेत आली होती जेव्हा ती लग्नाआधीचं प्रेग्नेंट झाली होती. सेलेनाने बॉयफ्रेंड पीटर हागसोबत लग्न केलं आहे. तिने लग्नानंतर काही दिवसांतचं दोन जुळ्व्या मुलांना जन्म दिला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा सेलेनाने पुन्हा 2 जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र दुर्दैवाने त्यातील एका मुलाचा नंतर मृत्यू झाला होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment