Home /News /entertainment /

अमिताभ बच्चन यांना दिलासा; 'प्रतीक्षा' वरील कारवाई तूर्तास टळली

अमिताभ बच्चन यांना दिलासा; 'प्रतीक्षा' वरील कारवाई तूर्तास टळली

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना तूर्तास दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावरील कारवाई सध्या तरी थांबवली आलं आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेते अमिताभ बच्चन   (Amitabh Bachchan)  यांना तूर्तास दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावरील कारवाई सध्या तरी थांबवली आलं आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं बीएमसीनं  (BMC)  म्हटलं आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण सध्या रास्ता रुंदीकरणासाठी कोणताही ठेकेदार मिळत नसल्यानं पालिकेनं प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवरील कारवाई न केल्याचं सप्ष्टीकरण बीएमसीनं लोकायुक्त व्हीएम कानडे यांना सादर केलं आहे. काही दिवसांपूर्वी लोकायुक्त व्हीएममकानडे यांनी चार आठवड्यांच्या आत या कारवाईबद्दलचा अहवाल सादर करायचा आदेश बीएमसीला दिला होता. त्यानुसार अहवाल सादर करत बीएमसीनं म्हटलं आहे, 'सध्या जुहू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांच्याकडे कोणताही ठेकेदार उपलब्ध नाही. त्यामुळे तूर्तास प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडली जात नाहीय. आणि भिंत पाडण्याचं काम पुढील आर्थिक वर्षात केलं जाईल'. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नगरसेविका ट्यूलिप मिरांडा यांनी महाराष्ट्र लोकायुक्तांकडे तक्रार केली होती कि, बीएमसी 2017 पासून रस्ता रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्याकडून जागा ताब्यात घेण्यास अपयशी ठरली आहे. त्यांनतर लोकायुक्त व्हीएम कानडे यांनी यासंबंधी चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. (हे वाचा:सलमान खाननं रेंटवर दिलं वांद्रयातील अपार्टमेंट! महिन्याला घेणार इतकं भाडं) बीएमसीच्या या स्पष्टीकरणावरून पुन्हा एकदा असा प्रश्न निर्माण झाला आहे, कि सर्वसामान्यांवर थेट कारवाई होते तर सेलेब्रेटींसाठी खास वागणूक का? मात्र लोकायुक्त व्हीएम कानडे यांनी बीएमसीचं हे स्पष्टीकरण मान्य केलेलं नाही. आता लोकायुक्त कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2017 मध्ये पाठवली होती नोटीस- 2017 मध्ये अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवून, त्यांच्या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्यास सांगण्यात आले होते. प्रतीक्षा बंगल्यापासून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीएमसीने हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. योजनेअंतर्गत संत ज्ञानेश्वर रस्त्याचे 40 ते 60 फूट रुंदीकरण करायचे आहे.अशातच बीएमसीने 2019 मध्ये सटे बाऊंड्रीवरील भिंत पडली होती. मात्र अमिताभ यांची भिंत अशीच सोडून दिली होती. दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक ट्यूलिप मिरांडा यांनी बीएमसीच्या पश्चिम प्रभागात हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भागाच्या रुंदीकरणात मुद्दामहून विलंब करत असल्याचा आरोप केला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, BMC, Mumbai

    पुढील बातम्या