मुंबई, 31 मार्च : भारतातील आपल्या प्रकारचे पहिले बहुविद्याशाखीय सांस्कृतिक क्षेत्र, नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र मुंबईत सुरू होणार आहे. जिथे भारतातील आणि जगभरातील प्रेक्षक संगीत, नाट्य, ललित कला आणि हस्तकला या क्षेत्रातील भारतातील सर्वोत्तम गोष्टींचे साक्षीदार होऊ शकतात. लॉन्च आधी नीता मुकेश अंबानी यांनी या ठिकाणी रामनवमीची पूजा केली. त्यांचा पूजा करतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चं 31 मार्च रोजी उद्घाटन करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती आणि कलेसाठी नवी दालनं खुली होतील असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटनानिमित्त संपूर्ण 3 दिवसांचा ब्लॉकबस्टर शो असेल. यासाठी खास तिकीटं देखील आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि कलेच्या क्षेत्रात भारत आणि जगाच्या सर्वोत्तम गोष्टी आणण्यासाठी केंद्र निश्चित पावले उचलेल. लॉन्च इव्हेंटमध्ये 'स्वदेश' नावाचे खास क्युरेट केलेले कला आणि हस्तकला प्रदर्शनासह तीन शो - 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन' या संगीताचे प्रदर्शन असेल.'इंडिया इन फॅशन' नावाचे वेशभूषा कला प्रदर्शन आणि 'संगम' नावाचा व्हिज्युअल आर्ट शो देखील असेल.
देशातील नवं सांस्कृतिक केंद्र असलेल्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्घाटनापूर्वी नीता अंबानींनी पारंपरिक पद्धतीने पूजा केली.#NMACC #NitaMukeshAmbaniCulturalCentre #NitaAmbani #MukeshAmbani pic.twitter.com/RTl2kurqwT
— News18Lokmat (@News18lokmat) March 31, 2023
NMACC वर बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, 'भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध' आहोत असं म्हणाल्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या, 'मला आशा आहे की आमच्या जागा भारतातील आणि जगभरातील लोकांना एकत्र आणून प्रतिभेचे पालनपोषण आणि प्रेरणा द्यायला हवी.' या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील कलाकारांसह बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, नीता अंबानी सांस्कृतिक केंद्रात पूजा केली. पूजेनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एक स्वप्न साकार झालं. आपला सांस्कृतिक वारसा बहरेल असे ठिकाण आपल्याला निर्माण करायचे आहे.
या उद्घाटनाच्या निमित्तने खास 'स्वदेश' नावाचे विशेष कला आणि हस्तकला प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. भारतातील परंपरेचं दर्शन घडवणारं हे प्रदर्शन असेल. 'संगम' नावाचा व्हिज्युअल आर्ट शोही आयोजित करण्यात आला आहे. 'या सांस्कृतिक केंद्राचे स्वप्न साकार करणे माझ्यासाठी एक आगळा वेगळा प्रवास आहे. सिनेमा असो वा संगीत, नृत्य असो वा नाटक, साहित्य असो वा लोककथा, कला असो वा हस्तकला, विज्ञान असो वा अध्यात्म. कल्चरल सेंटरमध्ये देशातील आणि जगातील सर्वोत्तम कला प्रदर्शने इथे होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nita Ambani