रणबीरचं नक्की काय चाललंय? आई नितू सिंगला झालीय लग्नाची घाई

रणबीरचं नक्की काय चाललंय? आई नितू सिंगला झालीय लग्नाची घाई

सध्या नितू कपूर लेकासाठी मुलगी शोधतेय. तसा चंगच बांधलाय तिनं. त्यासाठी एखाद्या पार्टीत सुंदर मुलगी दिसली की लगेच ती तिची ओळख रणबीरशी करून देते.

  • Share this:

01 डिसेंबर : आई कुणाचीही असो, तुमची-आमची नाही तर सेलिब्रिटींची. प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी ही असतेच. आता रणबीर कपूरचंच पाहा ना. आधी दीपिका आणि नंतर कतरिना... पण कुणाशीच नीट जुळलं नाही. दर वेळी ब्रेकअप हे ठरलेलंच. मग आई नितू कपूरची झोप उडाली तर नवल नाही.

सध्या नितू कपूर लेकासाठी मुलगी शोधतेय. तसा चंगच बांधलाय तिनं. त्यासाठी एखाद्या पार्टीत सुंदर मुलगी दिसली की लगेच ती तिची ओळख रणबीरशी करून देते. पण रणबीरनं आपल्या आईच्या प्रयत्नांवर पाणी ओतलंय. त्यानं निक्षून सांगितलंय. तो अजून लग्नाला तयार नाही. ती वेळ आली नाहीय.

नुकताच रणबीर न्यूयाॅर्कला गेला होता. तिथले त्याचे आणि मिहिरा खानचे एकत्र फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा दोघांनी आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असं म्हटलं होतं. पण कुछ तो गडबड है नक्की!

First published: December 1, 2017, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading