मुंबई, 28 जून : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं नातं चांगलंच बहरत चालल्याचं दिसतंय. कारण नीतू सिंग कपूर यांच्या 60व्या वाढदिवसाचं निमंत्रण आलियालाही देण्यात आलंय. या वाढदिवसाचं ग्रँण्ड सेलिब्रेशन पॅरिसमध्ये होणारे. यासाठी रणबीरने त्याच्या व्यस्त शेड्युलमधून आठवड्याभराचा ब्रेक घेतलाय. तर आलियानेही शूटमधून वेळ काढून चार दिवसांची सुट्टी काढलीय. त्यामुळे नीतूजींचा वाढदिवसासाठी हे दोघे पॅरिसला एकत्र साजरा करणार असल्याच्या चर्चा सुरू झालीय.
ऋषी कपूरनं पॅरिसला ही ग्रँड पार्टी आयोजित केलीय. 8 जुलैला नीतू सिंग यांचा वाढदिवस आहे. दोघांचे बंध बऱ्याच वर्षांपासूनचे. नीतू सिंग 21 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं.
नीतू सिंग खरं तर सुनेची वाट पाहतायत. पण रणबीर काही त्यांना तो आनंद देत नाहीय. दीपिका, कतरिनानंतर आता आलिया तरी कपूर खानदानाची सून होईल, असं नीतू सिंगना वाटतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.