रणबीरच्या वाढदिवशी नीतू कपूरनं शेअर केल्या जुन्या आठवणी

रणबीरच्या वाढदिवशी नीतू कपूरनं शेअर केल्या जुन्या आठवणी

रणबीरची आई नीतू कपूरनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय.

  • Share this:

28 सप्टेंबर : रणबीर कपूर आज आपला 36वा वाढदिवस साजरा करतोय. त्याचं कुटुंब, मित्रपरिवार,फॅन्स सगळे त्याला शुभेच्छा देतायत. रणबीरची आई नीतू कपूरनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय.

फोटोत रिद्धिमा कपूर आणि ऋषी कपूरही आहे. नीतूनं फोटोखाली लिहिलंय, 'हॅपी बर्थ डे. तुझ्यासारखा मुलगा सगळ्यांनाच हवा असतो. प्रेमानं देखभाल करणाऱ्या तुला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद. फॅन क्लबनं चांगलं काम केलंय. सगळ्यांना धन्यवाद.'

तर ऋषी कपूरनं ट्विट करून 28 सप्टेंबरचं महत्त्व सांगितलंय. त्यानं लिहिलंय, 28 सप्टेंबर जन्मदिन - भगतसिंग, लता मंगेशकर, रणबीर कपूर. आणि 44 वर्षांपूर्वी मला नवं आयुष्य मिळालं. 'बाॅबी' रिलीज झाला.

रणबीर सध्या संजय दत्तचा बायोपिक असलेला सिनेमा करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 05:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading