बाप-मुलाच्या भूमिका बदलल्या, म्हणतायत नितू कपूर

बाप-मुलाच्या भूमिका बदलल्या, म्हणतायत नितू कपूर

सध्या ऋषी कपूर न्यूयाॅर्कला ट्रीटमेंट घेतायत. नितू कपूर आणि रणबीर त्यांच्या सोबत आहेतच. दोघंही ऋषी कपूर यांची काळजी घेतायत.

  • Share this:

मुंबई, 26 आॅक्टोबर : सध्या ऋषी कपूर न्यूयाॅर्कला ट्रीटमेंट घेतायत. नितू कपूर आणि रणबीर त्यांच्या सोबत आहेतच. दोघंही ऋषी कपूर यांची काळजी घेतायत.

नुकताच नितू कपूरनं ऋषी कपूर आणि रणबीरचा एक फोटो शेअर केलाय. त्यात ऋषी कपूर आणि रणबीर पाठमोरे आहेत. वडिलांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवलाय. त्यावर त्यांनी असं लिहिलंय, भूमिका बदलल्या.

कपूर कुटुंबानं लंडनला एक अपार्टमेंट भाड्यानं घेतलंय. त्यात ते राहतायत आणि ऋषी कपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मध्यंतरी आलिया भट्ट न्यूयाॅर्कला पोचली . तिचे कपूर कुटुंबाबरोबरचे फोटोजही व्हायरल झाले होते. नितू कपूर आणि आलियामध्ये एक वेगळे बंध तयार झाल्याचं त्यांच्या बाॅडी लँग्वेजवरून दिसतं.

मध्यंतरी, 'नितूला आवडते, मला आवडते, रणबीरला आवडते, समजलं?' काही दिवसांपूर्वी ऋषी कपूरनं म्हटलं होतं. त्यानंतर सोनी राझदानसाठी रणबीर हा 'लव्हली लव्हली बाॅय' आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना आलिया-रणबीरबद्दल जी चर्चा  किंवा अफवा आहे त्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मी माझ्या मुलीशी थेट बोलू शकते.'

त्या पुढे म्हणाल्या, ' माझं आणि माझ्या मुलीचं नातं खूपच चांगलं आहे. मला अफवांकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी थेट बोलू शकते. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहीत असतं. शेवटी ते तिचं जीवन आहे. तिला हवं तसं जगू द्यायला हवं. तिचे निर्णय ती स्वत: घेते.'

काही दिवसांपूर्वी रणबीरनं लग्न कधी करायचं यावरही गंभीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, ' जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, एकमेकांबरोबर आयुष्य घालवावं असं वाटतं तेव्हा लग्न करायचं. माझ्या आयुष्यात तरी अजून कुणी नाहीय. मी 35 वर्षांचा झालो, म्हणून आता लग्न करायला हवं, असं अजिबातच नाहीय. ते सहज व्हायला हवं.'

निकनं प्रियांकाला गिफ्ट दिलेल्या आलिशान घराचे Photos पाहिलेत का?

First published: October 26, 2018, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading