'डोबिंवली फास्ट'चा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती गंभीर; रुग्णालयात केलं दाखल

'डोबिंवली फास्ट'चा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती गंभीर; रुग्णालयात केलं दाखल

हिंदीतील दृश्यम या चित्रपटामुळे निशिकांत कामतची हिंदीमध्ये मोठी चर्चा झाली होती.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच अनेक कलाकारांपासून राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने वृत्त समोर येत आहे. सर्वच चाहत्यांसाठी ही बाब चिंता वाढवणारी आहे. त्यात मराठी चित्रपट क्षेत्रापासून करिअरची सुरुवात करणारा आणि अनेक नाटकं, सवाई गाजवणारा निशिकांत कामत याला रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

एका वेबसाइटने याबाबतची माहिती दिली आहे.  दिग्दर्शक निशिकांत कामत याने मराठी चित्रपट डोबिंवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. डोबिंवली फास्ट या चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. त्यानंतर 2008 मध्ये मुंबई मेरी जान याचित्रपटातही त्याचं काम पाहायला मिळालं. हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला. या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुक केलं. अजय देवगन, तब्बू यांसारख्या मोठ्या कलाकारांसह केलेला या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटाकवले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याला हैद्राबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.  spotboue.comने दिलेल्या बातमीनुसार निशिकांत कामत Liver Cirrhosis ने ग्रस्त होता. त्यानंतर आज त्याला पुन्हा त्रास सुरू झाल्याने हैद्राबाद येथे हलविण्यात आलं आहे. निशिकांत कामत याचा 2020 मध्ये नवा चित्रपट येणार आहे. सध्या त्याची तयारी सुरू आहे. दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत कामतने अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 11, 2020, 11:04 PM IST

ताज्या बातम्या