मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

चित्रपटसृष्टीवर शोककळा; 'दृश्यम'चे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

चित्रपटसृष्टीवर शोककळा; 'दृश्यम'चे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता, दिग्दर्शक निशिकांत कामत (Nishikant kamat) यांचं निधन झालं आहे. अभिनेता रितेश देशमुखने याबाबत ट्वीट केलं आहे.  निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास होता. त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही वेळापूर्वी त्यांच्या मृत्यूची मातमी पसरली. मात्र रितेश देशमुखने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं. आता रितेशने त्यांच्या निधनाबाबत पोस्ट केली आहे.

निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा 'दृश्यम', इरफान खानचा 'मदारी', जॉन अब्राहमचा 'फोर्स' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं.

दिग्दर्शनाबरोबरच ते सिनेमांमध्ये नकारात्मक भूमिका करत असत. भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर अमेय खोपकर यांनी भावुक पोस्ट केली आहे.

दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी मराठी चित्रपट डोबिंवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. डोंबिवली फास्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. त्यानंतर 2008 मध्ये मुंबई मेरी जान या चित्रपटातही त्याचं काम पाहायला मिळालं.

हे वाचा - बिनधास्त कंगना रणौतला आता वाटू लागली भीती; सोशल मीडियावर झाली व्यक्त

हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला. या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुक केलं. अजय देवगन, तब्बू यांसारख्या मोठ्या कलाकारांसह केलेला या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटाकवले.

First published: