Home /News /entertainment /

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, मृत्यूची बातमी खोटी असल्याचं रितेश देशमुखनं केलं ट्वीट

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, मृत्यूची बातमी खोटी असल्याचं रितेश देशमुखनं केलं ट्वीट

निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास असून. त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरत होती. मात्र अभिनेता रितेश देशमुखनं निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून, तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळं अफवा पसरवू नका, असे ट्वीट केले आहे. निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास असून. त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, निशिकांत कामत यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे, सुभाष देसाई यांनीही श्रध्दांजली वाहत ट्वीट केले. मात्र रितेशनं ट्वीट केल्यानंतर त्यांनीही हे ट्वीट डिलीट केले. दिग्दर्शक निशिकांत कामत याने मराठी चित्रपट डोबिंवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. डोबिंवली फास्ट या चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. त्यानंतर 2008 मध्ये मुंबई मेरी जान या चित्रपटातही त्याचं काम पाहायला मिळालं. हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला. या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुक केलं. अजय देवगन, तब्बू यांसारख्या मोठ्या कलाकारांसह केलेला या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटाकवले. अनेक सिनेमांचं केलं दिग्दर्शन निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा 'दृश्यम', इरफान खानचा 'मदारी', जॉन अब्राहमचा 'फोर्स' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. दिग्दर्शनाबरोबरच ते सिनेमांमध्ये नकारात्मक भुमिका करत असतं. भावेश जोशी सिनेमात त्याने काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या