सुलेखा तळवलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणून निशिगंधा वाड (Nishigandha Wad) LGBTQ संदर्भात जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांना बरीच टीका सहन करावी लागली.
मुंबई, 04 जानेवारी : आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून निशिगंधा वाड (Nishigandha Wad) यांचं नाव घेतलं जातं. निशिगंधा वाड काही दिवसांपूर्वी एका वादात सापडल्या होत्या. अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी LGBTQ संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ही मुलाखत यूट्यूबवर प्रसिद्ध होताच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली. त्यामुळे त्यांना माफीदेखील मागावी लागली आहे.
काय म्हणाल्या होत्या निशिगंधा वाड?
खासगी आयुष्यातील समतोल आणि मुलांच्या जन्माबद्दल बोलताना निशिगंधा वाड LGBTQ समुहाबद्दल म्हणाल्या, ‘निसर्गाच्या विरोधात जाणारा प्रवास हा मला पचनी पडत नाही. समलिंगी संबंधांबद्दल माझं मत थोडं वेगळं आहे. आजकालच्या तरुण पिढीला वाटतं, हाऊ कॅन यू कॉन्ट्रॅडिक्ट? तुम्ही नॉर्मल नाही आहात का? या व्यक्तींचे जसे मानवाधिकार आहेत तसे त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांचेही मानवाधिकार आहेतच ना? ते आई –वडील म्हणून कोणाची ओळख करुन देणार?’
निशिगंधा वाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना समलिंगी व्यक्तींप्रमाणेच या समिलिंगी संबंधांना सहमती असणाऱ्या लोकांचाही विरोध सहन करावा लागला. वाढता विरोध लक्षात घेता त्यांनी माफी मागितली. त्या म्हणाल्या, ‘LGBTQ समुहाच्या किंवा इतर कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी सामाजिक क्षेत्रात काम करतेय तृतीयपंथींसोबतही काम चालतं. मला कोणावरही आरोप करण्याचा हेतू नव्हता. गे असणं, लेस्बियन असणं ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. मी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.’
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.