मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘मार खाणाऱ्या निशानं कॅमेरे बंद का केले?’ करणचा घटस्फोटित पत्नीला सवाल

‘मार खाणाऱ्या निशानं कॅमेरे बंद का केले?’ करणचा घटस्फोटित पत्नीला सवाल

निशानं कोणालाही न सांगता घरातील सर्व कॅमेरे बंद का केले? अभिनेत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

निशानं कोणालाही न सांगता घरातील सर्व कॅमेरे बंद का केले? अभिनेत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

निशानं कोणालाही न सांगता घरातील सर्व कॅमेरे बंद का केले? अभिनेत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 6 जून: अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) आणि अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) यांच्यातील वाद दिवसेंदिवस जास्तच पेटत चालला आहे. निशानं करणवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. परंतु काही तासांतच जामिनावर त्याची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर येताच त्यानं निशाचे सर्व आरोप फेटाळून लावले. शिवाय जर तिला मी मारलं तर ती घटना कॅमेरात कैद का झाली नाही? माझ्या घरातील CCTV कॅमेरे तिनं बंद का केले? असा उलट सवाल त्यानं निशाला केला. यावर आता तिनं देखील करणला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

बलात्कार प्रकरणात निया शर्माने दिला पर्ल व्ही. पुरीला पाठींबा

नेमकं काय म्हणाला करण?

“आमच्या चार बेडरूमच्या घरात सात कॅमेरे बसवलेले आहेत. बेडरूम सोडून प्रत्येक खोलीत कॅमेरा आहे. हॉलमधील कॅमेरा देखील अशा प्रकारे लावण्यात आलेला आहे की ज्या द्वारे घरातील भिंती दिसू शकतात. यापैकी एका भिंतीवर डोक आपटून तिनं रक्त काढलं होतं. पण तिनं घरातील सर्व कॅमेरे बंद का केले? जर माझ्याकडे आता ती क्लिप असती तर सगळं काही आताच स्पष्ट झालं असतं. पण कॅमेरांचा मुख्य स्विच बंद केलेला होता. हे सर्व तिनं नियोजनबद्ध पद्धतीनं केलं आहे.” असा सवाल करणनं वृत्तमाध्यमांशी बोलताना केला.

अशोक सराफ यांनी का नाकारले गेस्ट रोल? सांगितलं चकित करणारं कारण

निशानं दिलं प्रत्युत्तर...

करणच्या या आरोपांवर निशानं प्रत्युत्तर दिलं. तिनं घरातील सर्व कॅमेरे बंद केल्याचं मान्य केलं. कारण करण कॅमेरासमोर तिच्यासोबत चांगलं बोलायचा. पण बेडरुममध्ये जिथे कॅमेरा नाही तिथं तो तिच्यासोबत भांडायचा. बेडरुममध्ये तो तिला मारायचा देखील. अर्थात ते कधीही कोणी पाहू शकणार नाही. त्यामुळं करणची केवळ एकच बाजू लोकांना कळू नये म्हणून तिनं घरातील सर्व कॅमेरे बंद केले. आता पोलिसांनी रेकॉर्डर ताब्यात घेतला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. टीव्ही क्षेत्रातील अनेक मोठे कलाकार या प्रकरणाच्या निमित्तानं दोन विभागात विभागलेले दिसत आहेत.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Entertainment, Tv actor, Tv actress