मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Nisha Rawal-Karan Mehra प्रकरणाला नवं वळण, मैत्रीण कश्मिरा शाहनेच निशावर केले गंभीर आरोप

Nisha Rawal-Karan Mehra प्रकरणाला नवं वळण, मैत्रीण कश्मिरा शाहनेच निशावर केले गंभीर आरोप

 'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेतून अभिनेता करण मेहरा घराघरात पोहोचला होता. या मालिकेत त्याने साकारलेली 'नैतिक'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेतून अभिनेता करण मेहरा घराघरात पोहोचला होता. या मालिकेत त्याने साकारलेली 'नैतिक'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेतून अभिनेता करण मेहरा घराघरात पोहोचला होता. या मालिकेत त्याने साकारलेली 'नैतिक'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

    मुंबई,16 ऑगस्ट-   'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेतून अभिनेता करण मेहरा घराघरात पोहोचला होता. या मालिकेत त्याने साकारलेली 'नैतिक'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. छोट्या पडद्यावरील स्टार असणारा हा अभिनेता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचारासारखे गंभीर आरोप लावले होते. या आरोपांना फेटाळून लावत करणने निशाबाबत धक्कादायक खुलासे केले होते. दरम्यान या परिस्थितीमध्ये दोघांना त्यांचे मित्रमंडळी पाठिंबा देताना दिसून येत आहेत. अभिनेत्री कश्मिरा शाहने या सर्व प्रकरणावर मौन सोडत चकित करणारे खुलासे केले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण- काही महिन्यांपूर्वी करण मेहरा आणि निशा रावल यांचं भांडण मीडियासोर आलं होतं. यावेळी निशाने मीडियासमोर करण मेहरावर गंभीर आरोप लावत, आपल्याला मारहाण आणि शारीरिक छळ होत असल्याचं म्हटलं होतं.इतकंच नव्हे तर करणच्या कुटुंबीयांनीही आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप निशाने केला होता. या सर्व आरोपांना करण मेहराने फेटाळून लावलं होतं. तेव्हापासून हे दोघेही विभक्त राहात आहेत.आणि त्यांनतर त्यांचा वाद वाढतच चालला आहे. करण मेहराने आरोप फेटाळले- नुकतंच अभिनेता करण मेहराने मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेदरम्यान करणने अनेक धक्कादायक खुलासे करत सर्वानांच चकित केलं आहे. मात्र अभिनेत्याच्या एका दाव्याने सर्वानांच धक्का बसला आहे. अभिनेत्याने मीडियाशी संवाद साधत सांगितलं की, निशा रावलचं भावासोबतच प्रेमप्रकरण सुरु आहे. वास्तविक निशा रावलचं तिचा मानलेला भाऊ रोहित सेठिया सोबतचं अफेयर असल्याचं करणचं म्हणणं आहे. या गोष्टीने सर्वच चकित झाले आहेत. (हे वाचा:त्याने घरी बोलावलं अन् बेडरूममध्ये केला बलात्कार; गायकाविरोधात FIR दाखल ) कश्मिरा शाहचा खुलासा- निशा रावलच्या आरोपांवर आता अभिनेत्री कश्मिरा शाहने आक्षेप घेत आपलं मत व्यक्त केलं आहे. कश्मिरा ही निशा आणि करण दोघांचीही मैत्रीण आहे. निशा आणि करणच्या प्रकरणावर बोलताना कश्मिरानं म्हटलं, काही महिन्यांपूर्वी मला निशाचा फोन आला होता. त्यावेळी तिनं म्हटलं होतं, आमच्यात गोष्टी ठीक नाहीयेत. त्यांनतर थोड्या वेळाने म्हणजे चक्क १२ वाजता मला रोहित सेठियाचा फोन आला. त्याने मला म्हटलं करणने निशाला मारहाण केली आहे. त्यामुळे मी चकित झाले. कारण करण हा एक असा व्यक्ती आहे ज्याने डासही मारला नाहीय. त्यामुळे निशाला मारहाण करणं यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण नंतर निशा आणि रोहित सतत गोष्टीं बदलू लागले त्यामुळे मला निशावर शंका येत होती. इतकच नव्हे तर निशाच्या खोलीतील कॅमेरासुद्धा बंद होता. सोबतच निशाणे आपल्या सर्व मित्रांना मदतीसाठी एकसारखाच मेसेज पाठवला होता. त्यामुळे कश्मिराने निशावर संशय घेत या सर्व प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. सोबतच कश्मिरा आता निशा आणि करण प्रकरणात करणची साक्षीदार बनली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actors

    पुढील बातम्या