मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नुसरतने लग्न अचानक अवैध का ठरवलं? पहिल्यांदाच समोर आला पती निखील जैनचा खुलासा

नुसरतने लग्न अचानक अवैध का ठरवलं? पहिल्यांदाच समोर आला पती निखील जैनचा खुलासा

अभिनेत्री नुसरत जहाँ TMC च्या खासदार आहेत. अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेअरची चर्चा होती. नुसरतच्या गरोदरपणाविषयी अफवांच्या बातम्याही आल्या होत्या. या सगळ्याबद्दल निखिलने खुलासा केला आहे.

अभिनेत्री नुसरत जहाँ TMC च्या खासदार आहेत. अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेअरची चर्चा होती. नुसरतच्या गरोदरपणाविषयी अफवांच्या बातम्याही आल्या होत्या. या सगळ्याबद्दल निखिलने खुलासा केला आहे.

अभिनेत्री नुसरत जहाँ TMC च्या खासदार आहेत. अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेअरची चर्चा होती. नुसरतच्या गरोदरपणाविषयी अफवांच्या बातम्याही आल्या होत्या. या सगळ्याबद्दल निखिलने खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 09 जून : बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी (Nusrat Jahan) पती निखिल जैन (Nikil Jain) पासून विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे. याबाबत तिनं एक निवेदन काढून आपण आणि निखिल जैन यांच्यामध्ये कोणतेही वैवाहिक संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक घटना आहे. गेल्या नोव्हेंबरपासून दोघेही एकमेकांपासून विभक्त राहत आहेत. या व्यतिरिक्त नुसरत जहाँच्या गरोदरपणाच्या बातम्याही समोर आल्या. यावर निखिलने नुसरत गर्भवती (Nusrat Jahan pregnant) असल्याची आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

यासोबतच नुसरतच्या अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेअरचीही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. नुसरतच्या गरोदरपणाबद्दल चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. नुसरतने आज दिलेल्या निवेदनानंतर निखिल जैन यांनीही नात्यातील तूट आणि नुसरतने केलेल्या आरोपांबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे.

नुसरत जहाँ यांनी आज एका निवेदनाद्वारे सांगितले की, आमचे लग्न तुर्की विवाह नोंदणी अंतर्गत झाले आहे आणि हा विवाह सोहळा पूर्णपणे अवैध ठरला होता. कारण हे दुसर्‍या एका धर्मातील व्यक्तीशी लग्न होते आणि सामाजिक विवाह कायद्यानुसार याची अधिकृत नोंदणी होणं गरजेचं होतं, पण ती झाली नव्हती. यामुळे या लग्नाला काहीही अर्थ नव्हता. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो.

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

यावर बोलताना निखिलने सांगितले की, माझ्या मते हे लग्न कायदेशीर होते, मात्र तिने जे काही सांगितले आहे, त्यावर मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. आमचा मुद्दा दिवाणी न्यायालयात पोहोचला आहे आणि खटला न्यायालयात असे पर्यंत मी यावर कोणते मत व्यक्त करू शकणार नाही. पण, दोघेही विभक्त झाले आहेत, या वृत्ताला त्यांनीही दुजोरा दिला आहे. होय, आम्ही दोघांनीही आमचा मार्ग बदलला आहे आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दोघेही स्वतंत्र राहत आहेत.

हे वाचा - रुपाली भोसलेचा Before & After लूक पाहून चाहते अवाक्; पाहा VIRAL PHOTO

नुसरत जहाने 10-मुद्द्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, ती स्वत: बहीण आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेत आहे, त्यांच्यासाठी खर्च करत आहे. परंतु, काही लोक त्यासाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी कोणाचेही क्रेडिट कार्ड वापरत नाही. कोणीतरी असा दावा करतो, की तो श्रीमंत आहे. मी त्याच्या खात्यातून पैसे वापरतो. त्यांच्याबद्दल असे सांगितले गेले आहे. यासंदर्भात ती बँक प्रशासनाशी बोलणार असून लवकरच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे.

First published:

Tags: Actress, Marriage, West bengal