Home /News /entertainment /

पहिल्याच भेटीत निकच्या 'या' गोष्टीमुळे प्रियंका झाली होती चकित : मुलाखतीमध्ये खुलासा

पहिल्याच भेटीत निकच्या 'या' गोष्टीमुळे प्रियंका झाली होती चकित : मुलाखतीमध्ये खुलासा

priyanka chopra - News18 Lokmat

priyanka chopra - News18 Lokmat

प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिचा आगामी चित्रपट 'अनफिनिश्ड' (Unfinished) बद्दल सांगताना निक जोनासची (Nick Jonas) पहिली भेट झाली तेव्हाचा किस्सा सांगितला.

नवी दिल्ली,23 जानेवारी : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या 'Unfinished' या आगामी पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. व्हर्च्युअली ती या पुस्तकाचे प्रमोशन करत असून निक जोनास (Nick Jonas) , लिली सिंग आणि अनेकजण तिच्या या व्हर्च्युअल टूरमध्ये सहभागी आहेत. 9 फेब्रुवारीला तिचे हे पुस्तक मार्केटमध्ये चाहत्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या पुस्तकाच्या प्रमोशनवेळी प्रियांका आपल्या आयुष्यातील विविध घटनांवर भाष्य करत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यावसायिक आयुष्यातील अनेक घटनांवर देखील ती भाष्य करत आहे. नुकतेच तिने अमेरिकेत शिक्षण घेत असताना वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचा अनुभव शेअर केल्यानंतर आता तिच्या आणि निकच्या पहिल्या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. निक(Nick Jonas) आणि तिच्या पहिल्या भेटीविषयी बोलताना तिने पहिल्याच भेटीत निकने माझा हात धरल्याने त्याच्या धाडसीपणामुळे मी चकित झाल्याचे म्हटले. या भेटीत त्याने ज्या पद्धतीने तिच्याशी संवाद साधला आणि सकारात्मक पद्धतीने बोलला हे पाहून मी भरवल्याचे तिने सांगितले. त्याच्याबरोबर असताना मला सुरक्षित वाटत असल्याची भावना देखील प्रियंकाने यावेळी व्यक्त केली. आम्ही एकमेकांबरोबर खूप कमी कालावधी घालवल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. परंतु एकमेकांवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतल्याचे देखील ती यावेळी म्हणाली. https://youtu.be/TDPGpC2_Mqc काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रासोबत केलेल्या मुलाखतीदरम्यान तिला किती मुलं हवीत, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. मुलांच्या प्रश्नावर प्रियांका चोप्राने  (Priyanka Chopra) दिलेल्या उत्तराने सर्वचजण चाट झाले. 38 वर्षीय प्रियांका चोप्रा म्हणाली की, तिला 11 मुलं हवी आहेत आणि जोर जोराने हसू लागली. पुढे म्हणाली की, मला क्रिकेट टीम बनवायची आहे. ज्यामध्ये 11 जणं असतील.  11 मुलांची इच्छा व्यक्त केल्यानंतर ती काहीवेळ थांबली व म्हणाली की, 11 मुलं थोडी जास्त होती. कदाचित मी याबाबत नक्की सांगू शकत नाही.

हे देखील वाचा -  'वर्णभेदाचा सामना मलाही करावा लागला', प्रियांकाने उघड केला आत्मविश्वास डळमळीत करणारा तो अनुभव

दरम्यान सध्या प्रियांका तिच्या आगामी व्हाईट टायगर (White Tiger) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिने पिंकी मॅडम ही भूमिका साकारली असून निर्माती म्हणून देखील या चित्रपटामधे तिचा भाग आहे. नुकतेच तिने लंडनमध्ये टेक्स्ट फॉर यू (Text For You) चे शूटिंग पूर्ण केलं असून रुसो ब्रदर्सच्या  सिटाडेल आणि द मॅट्रिक्स 4 मध्ये देखील ती दिसणार आहे. ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर राजकुमार राव(Rajkumar Rao) दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर(Netflix) 22 जानेवारीला  रिलीज होणार आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Netflix, Nick jonas, Rajkumar rao

पुढील बातम्या