प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाला निकने शेअर केला 'देसी गर्ल'चा फोटो

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाला निकने शेअर केला 'देसी गर्ल'चा फोटो

प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि बहीण परिणीती चोप्रा दोघीही प्रियांकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या आहेत. परिणीतीने तर खास प्रियांकासाठी जबरिया जोडी या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनलाही बगल दिली.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै- नुकताच प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. चाहत्यांसोबतच अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात सर्वात खास व्यक्ती होती ती म्हणजे निक जोनस. निकने तिचा देसी लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत खास मेसेज लिहिला. निकने लिहिले की, ‘माझ्या आयुष्याचा प्रकाश... माझं हृदय... आय लव्ह यू.. वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

प्रियांकासाठी हा वाढदिवस खूप खास होता, कारण लग्नानंतर तिचा हा पहिला वाढदिवस आहे. या दिवसाचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडिओमध्ये सिनेमाच्या सेटवर तिचा वाढदिवस साजरा केला जात आहे. सुरुवातीला ती टीममधील एका व्यक्तिशी बोलताना दिसते. पण अचानक तिच्यासाठी केक आणला जातो आणि सारेच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात. यानंतर प्रियांका केक कापून आपला वाढदिवस साजरा करते.

 

View this post on Instagram

 

Light of my world. My whole heart. I love you baby. Happy birthday.

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

एवढंच नाही तर निकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रियांकाचा एक व्हिडिओ शेअर केला. यात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पार्टीसाठी तयार झालेली दिसत आहे. प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि बहीण परिणीती चोप्रा दोघीही प्रियांकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या आहेत. परिणीतीने तर खास प्रियांकासाठी जबरिया जोडी या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनलाही बगल दिली.

 

View this post on Instagram

 

HOLYYYY SMOKEEEEE!!! Priyanka in her birthday attire!!! 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 (🎥: @nickjonas ig story)

A post shared by i love you Priyanka Chopra 📍🇧🇩 (@priyankachopra.updates) on

83 Video- रणवीरसोबत प्रॅक्टिस करताना लेकानेच मोडली संदीप पाटील यांची बॅट

Kulbhushan Jadhav यांच्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त ट्वीट

'या' सहा अभिनेत्री ज्यांचे सेक्स सीन झाले होते लीक

सहा बंगले आणि आठ लग्झरी गाड्या, जाणून घ्या प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती

SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या