मुंबई, 7 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनससोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असून फ्रान्स नंतर निक-प्रियांका फ्रान्सनंतर आता इटलीला पोहोचले आहेत. निकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर इटलीतील एका रम्य सायंकाळचा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. ज्यात निक आणि प्रियांकाचा रोमँटिक अदाज पाहायला मिळत आहे. निकचा मोठा भाऊ जो जोनसचं लग्न आटोपल्यानंतर निक आणि प्रियांकानं त्यांचं व्हेकेशन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ते सध्या इटलीमध्ये असून मागच्या काही दिवसांपीसून तिथले फोटो आणि व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आहेत.
निकनं नव्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये इटलीच्या टस्कनीमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत. यात सूर्यास्ताच्यावेळी निक प्रियांका डान्स करताना दिसत आहेत. निकनं शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला असून एका चाहत्यानं त्यावर, 'हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरनं निक प्रियांकाला सर्वात 'क्यूट कपल' म्हटलं आहे.
डान्सर-सिंगर ते राजकारण, 'असा' आहे सपना चौधरीचा आतापर्यंतचा प्रवास
काही दिवसांपूर्वीच निक जोनसनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रियांका जेवण बनवताना दिसली होती . तर निक तिला यात मदत करताना दिसला होता. निकनं या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो आणि प्रियांकानं त्यांच्या डेट नाईटसाठी कुकिंग क्लास लावल्याचा खुलासा केला होता. यामध्ये प्रियांका आणि निक पास्ता आणि सॉस बनवताना दिसत होते. त्यांचा हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
BMC ला आता अक्षय कुमारचा आधार, मुंबईच्या समस्यावर निघणार तोडगा?
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत प्रियांका तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याविषयी बोलली होती. ती म्हणाली, एखादी व्यक्ती तुमचा बॉयफ्रेंड असणं आणि नवरा असणं किती वेगवेगळं आहे हे मला माहित नव्हतं. जेव्हा तुम्ही एकत्र वचन घेता त्यावेळी ती व्यक्ती तुमचं कुटुंब आहे आणि मी हे कुटुंब स्वीकारलं आहे. हे आपसुकच तुमच्या मनात येतं. त्या व्यक्तीच्या प्रति तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्हाला जाणवते. तुम्हाला एकमेकांबद्दल रोज काहीतरी नवं समजत असतं.
प्रियांका चोप्रा लवकरच सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ या सिनमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या आधी ती शेवटची बाजूराव मस्तानीमध्ये दिसली होती. ‘द स्काय इज पिंक’मध्ये प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय ती हॉलिवूड स्टार मिडी कलिंगसोबत एक कॉमेडी सिनेमा करत आहे.
सामन्या दरम्यान पंजाबी गाण्यावर थिरकली अनुष्का शर्मा, पाहा VIDEO
===================================================
EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?