मुंबई, 08 जून : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्या लग्नाला नुकतेच 6 महिने पूर्ण झाले. या काळात निक आणि प्रियांकाबद्दल अनेक उलट सुलट गोष्टी ऐकायला मिळाल्या अनेकदा प्रियांकावर वेगवेगळे आरोपही झाले. मात्र या सगळ्यात निक आणि प्रियांकामधील कधीच प्रेम कमी झालं नाही याउलट ते दोघंही त्यांची लाइफ एंजॉय करताना दिसले. नुकतच निकनं त्यांच्या भावी आयुष्याच्या नियोजनाविषयी खुलासा केला. पण यामुळे कदाचित आता प्रियांकाच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. कारण देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच ग्लॅमर सोडून शेती करणार असल्याचा खुलासा निकनं या मुलाखती दरम्यान केला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक म्हणाला, आजही मला शेती करावीशी वाटते. मी या लाइफसाठी माझा स्टारडम सोडायलाही तयार आहे. प्रियांकासोबत लग्न केल्यानंतरही मी हा विचार सोडलेला नाही. लग्नानंतर जेव्हा मी तिला याबद्दल बोललो तेव्हा तिनेही याला संमती दिली आणि ही खूप चांगली कल्पना असल्याचं सांगितलं. निक पुढे म्हणाला, मी जर फार्मलाइफ सुरू केलं तर फक्त माझ्याच नाही तर प्रियांकाच्याही आयुष्यातही खूप बदल होणार आहेत. तिच्यासाठी हे सर्व सोपं नसेल. ती एक यशस्वी स्टार आहे. चाहत्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी खूप नशीबवान आहे की माझी जीवनसाथी म्हणून मला प्रियांका भेटली.
VIDEO- 'या' अभिनेत्रीच्या घरात घुसलं माकड, बेडरूममध्ये घातला हैदोस
प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं 1 आणि 2 डिसेंबर 2018ला जोधपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं होतं. पण त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांचं लग्न खूप चर्चेत राहिलं. अनेकदा त्यांच्यावर टीकाही केली गेली. काही दिवसांपूर्वीच प्रियांकानं यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'लोक आमचं नातं खूप चुकीचं मानतात. मला याचं आश्चर्य वाटतं. जेव्हा मुलगा वयानं मोठा असतो तेव्हा कोणाला काहीही समस्या नसते मात्र तेच जर मुलीचं वय जास्त असेल तर मात्र ते टीका करायला सुरुवात करतात. माझ्यासाठी वय हे फक्त एक आकडा आहे. याहून अधिक महत्त्वाचं काय असतं तर तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता.'
‘ए तू नाचणं थांबव, खूप वाईट नाचतेस…’ ट्रोलर्सच्या कमेंटवर अभिनेत्रीने दिली भन्नाट प्रतिक्रिया
बॉलिवूडचा ‘हा’ स्टार शुटिंग नसेल तर करतो शेती