प्रियांकाची फॅशन सोडा, निकच्या मनगटावरचं घड्याळ पाहा; किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रियांकाची फॅशन सोडा, निकच्या मनगटावरचं घड्याळ पाहा; किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रियांकाच्या अतरंगी लुकच्या नादात संपूर्ण इव्हेंटमध्ये निकच्या डिझायनर सुटकडे मात्र सर्वांचच दुर्लक्ष झालेलं दिसलं.

  • Share this:

मुंबई, 7 मे : सध्या बॉलवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत चर्चा सुरू आहे ती प्रियांका चोप्राच्या मेट गाला लुकची. एकीकडी हॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या लुकचं कौतुक होतंय तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये तिच्या या लुकला ट्रोल केलं जात आहे. सिल्व्हर गाउन, मॅचिंग शूज आणि एफ्रो मेकअपमध्ये पिंक कार्पेटवर अवतरलेल्या प्रियांकावर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या प्रियांकाचा हा लुक एवढा चर्चेत आला की काही काळासाठी सोशल मीडियावर तिनं दीपिका पदुकोणलाही मागे टाकलं.

'मेट गाला 2019' प्रियांकानं Dior कंपनीचा 45 लाख रुपये किंमतीचा गाऊन आणि 10 लाख रुपयांच्या डायमंड इयरिंग्स घातले होते. यासोबतच प्रियांकानं असा काही मेकअप केला होता की, त्यात तिला ओळखणंही जवळजवळ कठीण झालं होतं. जगभरातील सर्वत्र सेलिब्रिटींमध्ये प्रियांका भलतीच भाव खाऊन गेली. सोशल मीडियावर काहींना तिचा लुक आवडला तर काहींनी तिच्यावर टीका केली. मात्र या सर्वात एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालं ते म्हणजे निक जोनसचं महागडं घड्याळ.

 

View this post on Instagram

 

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांका चोप्रासोबत मेट गालाच्या पिंक कार्पेटवर दजेरी लावणाऱ्या निकही एका डिझायनर सुटमध्ये दिसला. ज्यामध्ये त्यानं डायमंडसारखा चमकदार शर्ट आणि मॅचिंग शूज कॅरी केले होते. पण या सर्वात जास्त खास होतं ते म्हणजे निकचं घड्याळ. 38 कॅरेट हिऱ्यांनी मढवलेल्या या घड्याळाला व्हाइट गोल्डनं प्लेट केलं होतं. या घड्याळाची भारतीय किंमत जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त सांगितली जात आहे.

 

View this post on Instagram

 

Sansa... We must protect the vale. #metgala #littlefinger

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

निकचं ब्रँडेड घड्याळांचं वेड सर्वांनाच माहीत आहे. याआधीही तो लाखोंची घड्याळं घालताना दिसला आहे. पण यावेळी त्यानं मेट गाला लुकसाठी घातलेल्या या घड्याळाची किंमत त्यानं अगोदर घातलेल्या सर्व घड्याळांपेक्षा सर्वात जास्त आहे.

 

View this post on Instagram

 

He makes me sparkle ❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

Met Gala 2019 प्रियांकाच्या त्या विचित्र लुकनंतर दीपिकाबरोबरचा हा फोटो व्हायरल, दोघींच्या लुकची होतेय तुलना

प्रियांका चोप्राच्या 'मेट गाला लुक'वर नेटकरी सैराट, 'हे' भन्नाट मीम्स एकदा पाहाच

First published: May 7, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading