मुंबई, 07 एप्रिल : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर हे दोघंही नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका मासिकानं निक-प्रियांकाच्या घटस्फोटाचं वृत्त छापल्यानं सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. मात्र प्रियांकानं यावर आक्रमक पवित्रा घेतल्यावर मासिकानं माफी मागत हे वृत्त मागे घेतलं. पण आता पुन्हा एकदा निक-प्रियांका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एका व्हायरल व्हिडीओमुळे या दोघांचीही तुफान चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडीओमध्ये निक बॉलिवूडचे अभिनेते गोविंदांच्या 'मेरी पँट भी सेक्सी...' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
प्रियांका चोप्राच्या एका फॅनपेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या पोस्टमध्ये गोविंदा यांनाही टॅग करण्यात आलं आहे. 5 एप्रिलला जोनस ब्रद्रर्सचं 'कूल' हे गाणं रिलीज झालं. त्यांच्या 'सकर' या गाण्याप्रमाणं याही गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतातील त्यांच्या चाहत्यांनी 'कूल' या गाण्याचं 'मेरी पँट भी सेक्सी...' हे मर्ज व्हर्जन तयार केलं आहे. हा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
याआधी जवळपास 6 वर्षांनी जोनस ब्रदर्सनी 'सकर' या गाण्यातून पुन्हा कमबॅक केलं. यावेळी या गाण्याच्या व्हिडीओमध्ये जोनस ब्रदर्ससोबत प्रियांका चोप्रा आणि सोफी टर्नरसुद्धा दिसल्या होत्या. या गाण्याला सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता त्यांचं 'कूल' रिलीज झालं असून ते गाणंसुद्धा हिट होताना दिसत आहे. लवकरच प्रियांकासुद्धा बॉलिवूडच्या 'द स्काय इज पिंक' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात फातिमा सना शेख आणि फरहान अख्तर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
वाचा अन्य बातम्या
VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'
VIDEO: 'मोदी पंतप्रधान नाही झाले तर निदान खासदार तरी होतील'
VIDEO: तावडेंची हिम्मत असेल तर...मनसे नेत्याचं खुल्लं चॅलेंज
VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'