मुंबई, 08 मार्च : बॉलिवूडची देसी गर्ल सध्या पती निक जोनससोबत भारतात होळी सेलिब्रेट करत आहे. अनेकदा भारतातील महत्त्वाच्या सणांना प्रियांका आणि निक भारतात येत असतात. आताही होळी निमित्त ईशा अंबानीच्या पार्टीमध्ये या दोघांनी हजेरी लावली. सर्व बॉलिवूड कलाकरांमध्ये हे कपल भलतंच भाव खाऊन गेलं. या पार्टीचे इनसाइड फोटो आण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यात निक जोनस प्रियांकाच्या ड्रेसला हात पुसताना दिसत आहे.
ईशा अंबानीनं नुकत्याच दिलेल्या पार्टीचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी निक जोनसनं पहिल्यांदाच होळीचा सण साजरा केला. ज्याचे काही फोटो त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. याशिवाय निकचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. होळी खेळत असताना रंग लागून निकची अशी अवस्था झाली होती कि अखेर त्यानं हाताला लागलेला रंग प्रियांकाच्या ड्रेसला पुसला.
प्रियांकाच्या भावानं तिसऱ्यांदा उरकला साखरपुडा? याआधी 2 वेळा मोडलं आहे लग्न
प्रियांकानं या पार्टीसाठी व्हाइट आणि यलो कॉम्बिनेशनचा ड्रेस घातला होता. तर निक जोनस सुद्धा भारतीय पारंपरिक पोशाखात दिसला. या पार्टीमध्ये निकनं धम्माल मज्जा केली. ज्याचे फोटो त्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यात प्रियांकासोबत कतरिना कैफ सुद्धा दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं माझी पहिली होळी. माझ्या भारतातल्या दुसऱ्या घरी हा अनुभव खूपच चांगला होता.
स्वतःच्या नावावरच सिनेमा हिट करतात या अभिनेत्री, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क
या पार्टीमध्ये निक-प्रियांकासोबत आणखी एक कपल चर्चेत राहिलं ते म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात विकी कौशल कतरिनाला रंग लावताना दिसत होता. मागच्या काही काळापासून हे दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.
जीन्सवर साडी हा काय प्रकार, प्रार्थना बेहरेचं हे हटके फोटोशूट पाहिलं का?