मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बायकोसाठी काहीही; निक जोनसने भररस्त्यात पुरवला देसी गर्लचा हा हट्ट

बायकोसाठी काहीही; निक जोनसने भररस्त्यात पुरवला देसी गर्लचा हा हट्ट

बाल हट्ट आणि स्त्री हट्टापुढे कोणाचं काहीच चालत नाही. असंच काहीसं निक जोनसचं (Nick Jonar) प्रियांकाच्या (Priyanka Chopra) बाबतीत झालं आहे.

बाल हट्ट आणि स्त्री हट्टापुढे कोणाचं काहीच चालत नाही. असंच काहीसं निक जोनसचं (Nick Jonar) प्रियांकाच्या (Priyanka Chopra) बाबतीत झालं आहे.

बाल हट्ट आणि स्त्री हट्टापुढे कोणाचं काहीच चालत नाही. असंच काहीसं निक जोनसचं (Nick Jonar) प्रियांकाच्या (Priyanka Chopra) बाबतीत झालं आहे.

  लंडन, 16 डिसेंबर: बाल हट्ट आणि स्त्री हट्ट यापुढे कोणाचं काहीही चालत नाही असं म्हणतात. तीच गत निक जोनसच्या बाबतीत झाली आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनच्या रस्त्यावरुन भटकताना निक जोनस (Nick Jonas) आणि प्रियांका चोप्राचा एका फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये चक्क भररस्त्यात प्रियांका फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे आणि निक तिचा फोटो काढत आहे. निक जोनस त्याच्या बायकोसाठी चक्क फोटोग्राफर झाला आहे. प्रियांका सध्या लंडनमध्ये शूटिंगसाठी आली आहे. टेक्स फॉर यू (Text For You) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. प्रियांकासोबत निकदेखील या सिनेमामध्ये झळकणार आहे. टेक्स फॉर यू हा चित्रपट रोमँटिक ड्रामा असणार आहे. देसी गर्ल आणि तिच्या नवऱ्याला एकत्र पडद्यावर बघायला मिळणार यामुळे भारतामधील चाहतेही आनंदी झाले आहेत. टेक्स फॉर यूचं शूटिंग सुरू झालं आहे. शूटिंग करत असताना प्रियांका निकला चक्क कारमधून खाली उतरवते आणि त्याला अनेक अपशब्दही बोलते. असा सीन होता. हा सीन शूट करताना प्रियांका आणि निकने खूप मजामस्ती केली. जीम स्ट्रॉसे या प्रसिद्ध लेखकाने चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट एका जर्मन कादंबरीवरुन साकारण्यात येत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या लंडनमध्ये होत आहे.
  बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)चा प्रवास सुस्साट सुरू आहे. हॉलिवूडमध्ये रमलेली प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कधी दिसणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर ही देसी गर्ल आता लवकरच देसी अवतारात झळकणार आहे. राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि प्रियांका चोप्राचा द व्हाइट टायगर (The White Tiger) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. प्रियांका चोप्राने स्वत: इन्स्ट्राग्रामवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला होता.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Nick jonas, Priyanka chopra

  पुढील बातम्या