मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रियंका-निकमध्ये सारं काही आलबेल, घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! PC म्हणाली- I Love You

प्रियंका-निकमध्ये सारं काही आलबेल, घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! PC म्हणाली- I Love You

सोशल मीडिया अकाउंटमुळे अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra and Nick Jonas Relationship) आणि तिचा पती निक जोनस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत.

सोशल मीडिया अकाउंटमुळे अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra and Nick Jonas Relationship) आणि तिचा पती निक जोनस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत.

सोशल मीडिया अकाउंटमुळे अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra and Nick Jonas Relationship) आणि तिचा पती निक जोनस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत.

  मुंबई, 26 नोव्हेंबर: सेलेब्रिटींच्या प्रत्येक हालचालीवर चाहत्यांची अतिशय बारीक नजर असते. विशेषत: सेलेब्रिटीजच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर तर नेटिझन्स कायम लक्ष ठेवून असतात. सोशल मीडिया अकाउंटमुळे अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra and Nick Jonas Relationship) आणि तिचा पती निक जोनस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. प्रियांकानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरच्या नावातून 'जोनस' आडनाव काढून टाकल्यानं गोंधळ उडाला आहे. ही गोष्ट सोशल मीडियावर आगीसारखी पसरली असून पिसी आणि निकचं नातं बिघडल्याची चर्चा सुरू झाली. इतकंच नाही तर दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याही (Nick Jonas-Priyanka Chopra divorce rumors) फिरू लागल्या आहेत; मात्र निक आणि प्रियांकाच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत आहे. निक जोनासनं पत्नी प्रियांकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करून सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

  घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

  बॉलिवूड आणि हॉलिवूडमधलं लोकप्रिय कपल असलेले निक जोनास आणि प्रियांका चोप्रा कायम सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करत असतात. सध्या जगभरात त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. निक जोनासनं मात्र या गोष्टी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानं आपल्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट केली असून, त्यात प्रियांकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Nick Jonas (@nickjonas)

  निक जोनासनं शेअर केलेल्या फोटोमध्ये हे लव्हबर्ड्स एकमेकांच्या खूप जवळ असल्याचं दिसत आहे. प्रियांकाने निकच्या गळ्यात तिचे दोन्ही हात टाकलेले आहेत आणि निकही रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. बेज कलरच्या मॅक्सी स्वेटर ड्रेसमध्ये प्रियांका क्यूट दिसत आहे, तर निकदेखील तपकिरी लेदर जॅकेटमध्ये कूल दिसत आहे. निकनं या फोटोला 'हॅपी थँक्सगिव्हिंग! सर्वांना धन्यवाद' अशी कॅप्शनही दिलेली आहे.

  हे वाचा-लग्नानंतर कतरीना जाणार सलमानसोबत; तर विकी कौशल काय करणार? असा आहे प्लॅन

  प्रियांका म्हणाली 'आय लव्ह यू'

  प्रियांका चोप्रानंही दोन फोटो शेअर केले आहेत. ‘सर्व गोष्टींसाठी मी सर्वांची आभारी आहे. फ्रेंड्स, फॅमिली… आय लव्ह यू निक जोनास, थँक्सगिव्हिंग (Thanks giving) सेलिब्रेट करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा,’ अशी कॅप्शन तिनं या फोटोंना दिली आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Priyanka (@priyankachopra)

  व्हायरल झाली पोस्ट

  निकनं केलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निक आणि प्रियांकाच्या भारतातल्या चाहत्यांना दोघांचे हे फोटो खूप आवडले आहेत. कमेंट्सच्या माध्यमातून चाहते दोघांना थँक्सगिव्हिंगच्या शुभेच्छा देत आहेत. काहींनी तर कमेंटबॉक्समध्ये हार्ट इमोजी दिले आहेत.

  प्रियांकाच्या आईनं केलं होतं घटस्फोटांच्या बातम्यांचं खंडन

  निकच्या अगोदर प्रियांकाची आई डॉ. मधू चोप्रा यांनी घटस्फोटाच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं मधू चोप्रा म्हणाल्या होत्या. कुणीही अफवा पसरवू नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती.

  हे वाचा-'काटे नही कटते' वर नोरा-टेरेन्सचा जबरदस्त डान्स; बोल्ड VIDEOने सोशल मीडियावर....

  'या' कारणामुळं प्रियांकानं काढून टाकलं सासरचं आडनाव

  ग्‍लोबल रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्रानं जोनस ब्रदर्सच्या रोस्ट शोच्या प्रमोशनसाठी आपल्या नावापुढचं सासरचं आडनाव काढून टाकलं आहे. 'जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट'(Jonas Brothers Family Roast) नावाचा हा शो 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. जोनास ब्रदर्ससोबत या शोमध्ये त्यांचे पार्टनरदेखील सहभागी झाले होते. शोदरम्यान प्रियांकानंदेखील पती निक जोनसला चांगलंच रोस्ट केलं आहे. दरम्यान, प्रियांका चोप्रानं या सर्व प्रकरणावर मौन बाळगलं आहे.

  First published:

  Tags: Nick jonas, Priyanka chopra