S M L

'दिल मिल गये...' एक वर्षापूर्वी असे भेटले होते निक-प्रियांका

लग्नानंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या पण निक आणि प्रियांका नेहमीच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत राहिले.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 04:05 PM IST

'दिल मिल गये...' एक वर्षापूर्वी असे भेटले होते निक-प्रियांका

मुंबई, 26 मे : इंटरनॅशल कपल म्हणून ओळखले जाणारे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रियांका आणि निकचा शाही विवाह सोहळा उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडला. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या अफवा पसरल्या पण निक आणि प्रियांका नेहमीच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत राहिले. पण आजचा दिवस निक आणि प्रियांकासाठी खूप खास आहे. कारण मागच्या वर्षी याच दिवशी प्रियांका आणि निक एकमेकांना भेटले होते.

आपल्या आयुष्यातील या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी निकनं प्रियांकासाठी एक रोमँटिक पोस्ट लिहित मागच्या वर्षीच्या आठवणीना उजाळा दिला. यासोबतच त्यानं कान फेस्टिव्हलचा एक सुंदर फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. निकनं लिहिलं, 'एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी मी हॉलिवूडमध्ये माझ्या मित्रासोबत ब्यूटी अँड बीस्ट सिनेमा पाहण्यासाठी गेलो होतो. त्या ठीकाणी मला प्रियांका भेटली. जी नंतर माझी बेस्ट फ्रेंड , माझी म्यूज, माझी पार्टनर आणि आता माझी सुंदर पत्नी झाली. आपल्या आतापर्यंतच्या प्रवासासाठी धन्यवाद तू रोज माझ्या हसण्याचं कारण बनतेस. तुझा पती असल्याचा मला अभिमान वाटतो. आय लव्ह यू प्रियांका'

 

Loading...

View this post on Instagram
 

One year ago today I went to go see Beauty and the Beast at the Hollywood bowl with a group of friends. One of those friends was the woman that would become my best friend, my confidant, my muse, my beautiful wife. I am so grateful for our journey together so far. You make me smile every day and you inspire me to be the best version of myself. I am honored to be your husband. I love you. ❤️ @priyankachopra


A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

निकनं जशी प्रियांकासाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली त्याप्रमाणे प्रियांकानंही आपल्या पतीसाठी सोशल मीडिया पोस्टमध्ये खास मेसेज लिहिला. प्रियांका म्हणते, 'तु नेहमीच मला आवडत राहशील. एक वर्ष प्रेमपूर्तीच्या शुभेच्छा निक जोनस' मगच्या वर्षी याच दिवशी निकनं प्रियांकाला प्रपोज केलं होतं.
 

View this post on Instagram
 

The best husband ever...A #lambily member’s dream came true...Even though he was busy and we were apart, he made sure I celebrated our one year anniversary with my fave! The incomparable @mariahcarey #Mimi — you were amazing! So lovely meeting you and thank you for the incredible show...you will always be my baby @nickjonas Happy one year love! @fchhara thx for being my date! So fun! #mimi meets mimi wearing @mimi


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

एका मुलाखतीत प्रियांकानं मला सुरुवातीपासूनच निकसोबत माझं नाव लावण्याची इच्छा होती असं सांगितलं होतं. निकनं अगदी रोमँटिक स्टाइलमध्ये हिऱ्याची अंगठी घालत तिला लग्नासाठी प्रियांकाला प्रपोज केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2019 04:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close