'यात तर 20 लोकांचे कपडे होतील', कॉमेडियनने उडवली निया शर्माच्या ड्रेसची थट्टा

निया शर्माने घेर असलेला एक लेहंगा घातला आहे. हा लेहंगा घालून सोफ्यावर झोपलेला फोटो शेअर केला

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 01:53 PM IST

'यात तर 20 लोकांचे कपडे होतील', कॉमेडियनने उडवली निया शर्माच्या ड्रेसची थट्टा

मुंबई, 06 जुलै- टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या अभिनयाशिवाय फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. आपल्या मादक अदांनी आणि सौंदर्याने ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नियाने शेअर केलेल्या नवीन फोटोंचे अनेकजण कौतुक करत आहेत. मात्र एका कॉमेडीयनने तिच्या कपड्यांची थट्टा उडवली. त्याचं झालं असं की, फोटोत निया शर्माने घेर असलेला एक लेहंगा घातला आहे. हा लेहंगा घालून सोफ्यावर झोपलेला फोटो शेअर केला आहे. तर अजून एका फोटोमध्ये ती त्याच कपड्यांमध्ये असून खिडकीच्या बाहेर बघताना दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना नियाने लिहिले की, ‘And The 60’s Brunette Ball Bun ! What Fun!’ नियाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आणि तिच्या लुकचं भरभरून कौतुक केलं.

 

Loading...

View this post on Instagram

 

And The 60’s Brunette Ball Bun ! What Fun! @cashmakeupartistry ❤️ @joakim_roos bouffant 💯 @kalkifashion outfit🙌

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

'ये रिश्ता क्या केहलाता है' मालिकेतली अभिनेत्री लताने लिहिले की, ‘मारूनच टाकशील.’ टीव्ही अभिनेत्री रेहा पंडितने हॉट असे लिहिले. तर कॉमेडियन बलराजने '20 लोकांचे कपडे यात तयार होतील’ अशी कमेंट केली. आतापर्यंत निया शर्माचे हे फोटो 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी कमेंटही केल्या.

जास्तीत जास्त युझरने नियाच्या या फोटोंवर सकारात्मक कमेंट केल्या. नियाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, नियाने 'जमाई राजा', 'एक हजारों में मेरी बहना है', 'इश्क में मरजावा', 'खतरों के खिलाडी', 'बहनें' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयामुळे निया शर्माची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. आतापर्यंत नियाला इन्स्टाग्रामवर ३० लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

बॉलिवूडचे 'हे' दोन स्टार सिनेमे सोडून बिहारमध्ये करत आहेत शेती

बिग बॉस विजेत्या अभिनेत्याच्या भावाचा बुडून मृत्यू

स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge

VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nia sharma
First Published: Jul 6, 2019 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...